दहावीच्या परीक्षेत प्रणाली गायकवाडचे सुयश यश




दहावीच्या परीक्षेत प्रणाली गायकवाडचे सुयश यश
श्री शिवाजी विद्यालयातून सर्वप्रथम

बीड ।
नुकताच शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १७ जुन २०२२ रोजी जाहीर झाला. कोरोना सारख्या महाभंयकर काळात शिक्षण घण्याची पद्धत बदलली असतांना देखील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत परिश्रमाच्या जोरावर विक्रमी यश संपादन केले. या मध्ये बीड शहरातील श्री शिवाजी विद्यालयातून प्रणाली कु. प्रणाली गायकवाड या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. या परीक्षेसाठी शरदचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद गायकवाड यांची कन्या कु. प्रणाली गायकवाड ही श्री शिवाजी विद्यालयातून प्रविष्ट झाली होती. कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कु. प्रेरणा गायकवाड हिने ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने अत्यंत नियोजनबद्ध काळजीपुर्वक अभ्यास करून दहावीच्या परीक्षेमध्ये ९९.२० टक्के गुण घेऊन
घवघवीत यश संपादन करत श्री शिवाजी विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आई-वडील बहिण भाऊ मित्र-मैत्रीण नातेवाईक यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान भविष्यात प्रशासकीय सेवेत भरती होऊन समाजसेवा, देशसेवा करण्याचा निर्धार प्रणाली गायकवाड हिने व्यक्त केला आहे. कु. प्रणाली गायकवाड हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या नेञदीपक यशामध्ये आई-वडीलासह गुरुजनांचा मोठा वाटा असल्याचं तिने झुंजार नेताशी बोलताना सांगितले.
_________________________

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा