आदर्श विद्यालय येथील सिद्धी शिरसटने दहावीत 86% गुण मिळवून शाळेतून दुसरा नंबर पटकावला




आदर्श विद्यालय येथील सिद्धी शिरसटने दहावीत 86% गुण मिळवून शाळेतून दुसरा नंबर पटकावला
__________________

बीड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दि,17 जून रोजी जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये आदर्श माध्यमिक विद्यालय बीड येथे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी बीड येथील एका सर्व सामान्य कुटूंबातील मुलीने केली आहे. कु. सिद्धी सुदमराव सिरसट असं दहावीत 86% गुण मिळवलेल्या मुलीचं नाव आहे. तिने दिवस-रात्र अभ्यास करून आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. तिला भविष्यात पीएसआय व्हायचंय. इयत्ता दहावीत शिकत असताना आईने सिद्धी ला  घरातील कामं करून तिचे लक्ष अभ्यास करण्यात असायचे त्यामुळे तिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेत दुसरा नंबर गाजवला आहे. सिद्धी ला घरातील आत्या- लोपाताई शिंदे व आई -वडील यांच्या  मार्गदर्शनानुसार ती अभ्यास करायची, अभ्यास व सराव सिद्धी ने  खूप केला होता . त्यामुळे तिने परीक्षेचे टेन्शन घेतले नाही, तिच्या आई वडिलांनीही शिक्षणाच्या बाबतीत तिला काही कमी पडू दिलं नाही. अभ्यास करणे शाळेतून आल्यानंतर अभ्यास करणे असा तिचा दिनक्रम असायचा. ज्ञानेश्वरी ने पोलीस क्षेत्रात करिअर करायचं असून तिला पीएसआय व्हायचं आहे, असे सिद्धी चे स्वप्न आहे. शिक्षणात आर्थिक अडचणी आल्या तरी मुलींना शिकलं पाहिजे असं तिच्या कुटुंबियांची जिद्द आहे.
तीच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, पत्रकार, नातेवाईक तसेच गावकऱ्यांनी अभिनंदन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा