दहावीच्या परिक्षेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम!




दहावीच्या परिक्षेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम!

विद्यालयातून कु.कल्याणी डोंगरे प्रथम, कु. अनुजा शिंदे द्वितीय तर कु.आदिबा शेख तृतीय


बीड
मार्च एप्रिल 2022मध्ये घेण्यात
आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. या वर्षी शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेतून कल्याणी डोंगरे हिने 88.20 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला अनुजा शिंदे हिने 87.60 टक्के गुण घेऊन द्वितीय तर आदिबा शेख या विद्यार्थ्यांनीने 86.20 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला.
या बाबत अधिक माहिती अशी की बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये कु.कल्याणी डोंगरे हिने 88.20 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक, कु. अनुजा शिंदे हिने 87.60 टक्के गुण घेऊन द्वितीय तर आदिबा शेख या विद्यार्थ्यांनीने 86.20 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला.


चि. तेजस चंद्रकांत निकाळजे 85.80, कु. ऋतुजा जालिंदर काळे 85.00, कु.अनुराधा सोमनाथ धायगुडे 84.60, चि. गणेश हनुमंत तोडकर 83.20, चि.अनिकेत विजय कानडे 83.00, कु.वैष्णवी विठ्ठल भांगे 82.60, कु.योगिता अशोक मिसाळ 82.40 कु.स्वप्नाली नारायण देवकर 82.20 चि. संकेत सतीश कदम 82.00, कु सर्वज्ञा योगेश खोचे 81.80,
चि.तुषार आन्ना तावरे 81.00, कु.
अश्विनी धनंजय मोरे हिने 80.40 इतके गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. दहावी परीक्षेत श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आदरणीय श्री गोविंदरावजी वाघ साहेब, संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. सुदामतीताई वाघ मॅडम, संचालक मुख्याध्यापक श्री गणेश वाघ साहेब, श्री नामदेव वाघ साहेब शाळेचे मुअ श्री दत्तात्रय चव्हाण सर, श्री. आत्माराम वाव्हळ सर, श्रीमती फाटे मॅडम, श्रीमती साळुंके मॅडम, श्रीमती सानप मॅडम, श्री गणेश गुजर, वचिष्ट शिंदे, सचिन यादव, तान्हाजी मोरे, बाबाराम थोरात यांच्यासह सर्व पालकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा