आमदार साहेब रस्ता करायचा नव्हता तर खोदला कशाला?, सहा महिन्यापूर्वी शहरातील मुख्य रस्ता खोदल्याने बीडकर त्रस्त, आमदार साहेब मुक्ताई लॉन्स ते जय महाराष्ट्र हॉटेल या रस्त्यावरुन एकदा चक्कर मारा म्हणजे जनतेचे प्रश्न कळतील




आमदार साहेब रस्ता करायचा नव्हता तर खोदला कशाला?
सहा महिन्यापूर्वी शहरातील मुख्य रस्ता खोदल्याने बीडकर त्रस्त, आमदार साहेब मुक्ताई लॉन्स ते जय महाराष्ट्र हॉटेल या रस्त्यावरुन एकदा चक्कर मारा म्हणजे जनतेचे प्रश्न कळतील
बीड ।
आम्हीच बीडचा विकास करु शकतो अशी दवंडी पिटवणाऱ्या क्षीरसागरांनी जनतेला कायम मुलभूत सुविधांपासून वंचीत ठेवले आहे. मोठा गाजावाजा करुन गेल्या सहा महिन्यापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांनी शहरातून जाणारा जालना रोड बायपास- टू बायपास खोदून ठेवला. यातील काकू-नाना हॉस्पिटल पासून राष्ट्रवादी भवनापर्यंत काम कसे आणि किती दिवसात झाले हे बीडकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. मात्र त्या पुढे कामच केले नाही. त्यामुळे या रस्त्यावर नुसता धुरळा आणि मोठ- मोठे खड्डे पडले आहेत.

आमचा आणि जनतेचा सरळ साधा सवाल आहे की, आमदार साहेब तुमच्याच्याने होत नव्हत तर आमचा रस्ता खोदला कशाला. गेल्या सहा महिन्यांपासून बीडकरांच्या नाकातोंडात केवळ आमदार संदिप क्षीरसागरांमुळे धूरळा जात आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ होणे गरजेचे आहे.

बीड शहरातील जालना रोड हा मुख्य रस्ता आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात या रस्त्याच्या कामाचे नारळ फोडून सुरुवात केली. कासव तरी वेगात चालते तशी गत या रस्त्याच्या  कामाला होती. माध्यमांनी अवाज उठवल्यानंतर कोठे या रस्त्याच्या कामाला गती मिळाली. हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोपही अनेकदा झाला. काकु- नाना हॉस्पिटल ते राष्ट्रवादी भवन पर्यंत जो रस्ता झाला आहे. त्या रस्त्याच्या कडेला मुरुम टाकण्यात आला. यामध्ये मोठं- मोठी दगड गोटे टाकण्यात आली आहेत. तो मुरुम निट दाबला नसल्याने  काही भागात चढ-उतार झाला आहे. रस्त्याच्या कडेला पेवर ब्लॉक टाकणे गरजेचे होते. थोडा पाऊस झाला तरी वाहने या मुरमारुन रोडवर आले की सर्व रस्त्यावर चिखल होतो. त्यानंतर बारीक माती दुचाकी चालकांच्या डोळ्यात जाते. शिवाय नंतर प्रचंड धुरळा उडतो. केवळ करायं म्हणून या रस्त्याचं काम केल अशी भावना जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

सावधान…. बीडकरांनो बार्शी रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे
सहा महिन्यापूर्वी आमदार क्षीरसागर यांनी हा रस्ता करण्यासाठी खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठं- मोठे खड्डे पडले आहेत. जर तुम्ही या रस्त्यावरुन दुचाकीने प्रवास करणार असताल तर सावधान… कारण या रस्त्यावरील खड्डे चुकवतांना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात प्रचंड धूळ रस्त्यावर उडत असल्याने समोरील वहान दिसत नाही. तुम्ही निवडून दिलेल्या तुमच्या प्रतिनिधीला याचे काहीही सोयर सुतक नाही. त्यामुळे आता तुम्हीच सावधान राहून आपली आपणच जबाबदारी घेवून या रस्त्याने प्रवास करा. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

झालेले कामही अर्धवटच
काकु-नाना हॉस्पिटल पासून ते राष्ट्रवादीभवन पर्यंत जो रस्ता झाला आहे. त्याचे काम निट झाले नाही. शिवाय मुख्य रस्त्यावरुन शहरात जाणाऱ्या रस्त्याला हा रस्ता जोडण्यात आला नाही. त्यामुळे शाहू नगर (भोपळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या) रस्त्यावर पाणी साचते. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. या रस्त्याच्या कडेला जो मुरुम टाकला त्यात मोठ- मोठे दगड आहेत. या मुरमावरुन गाडी गेली तर त्याला लागून चिखल सिमेंट रस्त्यावर येतो. त्यामुळे मोठी धूळ उडते. जो रस्ता झाला त्यावरुनही प्रवास करणे कठीन झाले आहे.

झालेले रस्ते खोदून ठेवले
पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या समोर माने कॉम्प्लॅक्सकडे जाणारा रस्ता झाल्यानंतर खोदण्यात आला. मात्र पुन्हा तो दुरुस्त करण्यात आला नाही. वळणावरच रस्ता खोदून ठेवल्याने छोटे- मोठे अपघात होत आहे. हा रस्ता तात्काळ पुर्ववत करावा अशी मागणी सर्वसामान्य नगारिक करत आहेत.

शिवराज पान सेंटर चौकात मधोमध रस्का खचला
बार्शी रोडवरुन नवगन कॉलेजकडे जाणाऱ्या शिवराज पान सेंटर चौकात मधोमध गेल्या पंधरा दिवसापासून भला मोठा खड्डा पडलेला आहे. रात्री अपरात्री हा खड्ा दुर्दैवाने कोणाच्या जिवावर बेतू शकतो. याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. मोठा अपघात झाल्यावरच हा खड्ा बुझवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा