दुकडेगावमध्ये दरोडा, रोख 71 हजार रुपये व दहा ते पंधरा तोळे सोनं लंपास




दुकडेगाव मध्ये दरोडा रोख 71 हजार रुपये व दहा ते पंधरा तोळे सोनं लंपास
वडवणी प्रतिनिधी
वडवणी तालुक्यातील दुकडेगाव येथे मोहन सोपान कराड यांच्या घरी मोठा दरोडा पडला आहे  या दरोड्यामध्ये रोख 71 हजार रुपये व दहा ते पंधरा तोळे सोनं गेल्याची तक्रार मोहन सोपान कराड यांनी वडवणी पोलीस स्टेशनला दिली आहे या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, पुन्हा एकदा वडवणी तालुक्यामध्ये चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले आहे. मोहन सोपान कराड यांच्या घरी ही चोरी झाली असून 71 हजार रुपये रोख व दहा ते पंधरा तोळे सोने गेल्याची तक्रार त्यांनी वडवणी पोलिसात दिली आहे. मुलगी डिलिव्हरी साठी घरी आल्याने मुलीच्या अंगावरील संपूर्ण दागिने त्या आईने आपल्या घरात डब्यामध्ये ठेवले होते. व इतर काही रोख रखम डिलिव्हरी साठी जमा केलेली होती. ही सर्व रक्कम एका डब्यात घरामध्ये ठेवली होती. पत्राचं साधं घर आहे आणि कुणीतरी पाळत राखून मोहन सोपान कराड यांच्या घरावरचे पत्तर उचकून आत मध्ये प्रवेश केला. ज्या बाजूने पतर उचलले होते त्या बाजूने धान्याची थप्पी होती. आणि चोरट्याने त्या बाजूने घरामध्ये प्रवेश करून ही सर्व रक्कम व दागिने लंपास केले आहेत. या अगोदर त्यांच्याच बाजूला राहत असलेले शेख युनूस शेख करीम यांच्या घरी अशीच चोरी झाली होती. चोरीचा सत्र जास्त वाढल्याने पुन्हा एकदा या चोरट्यानी पोलिसासमोर मोठं आव्हान उभा केलं आहे. या घटनेमुळे परिसरातील व आजूबाजूला भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. लोकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 15 ते 20 दिवसांपूर्वी वडवणी शहरात सुद्धा आठ ते नऊ दुकाने चोरट्यांनी फोडल्या होत्या यामध्ये सुद्धा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. हे सत्र असंच सुरू राहिलं तर लोक भयभीत होऊन घराबाहेर पडणार नाहीत किंवा त्या भीतीने धंदा मजुरीला जाणार नाहीत आणि यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते. या घटनेचा तपास स्वतः एपीआय  आनंद कांगुणे  करत आहेत.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा