विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 




विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

शिरूर कासार l
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे तालुका अध्यक्ष दिलीप माने यांनी काल शिरूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री संत वामनभाऊ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून एक आदर्श घालून दिला.
वंचित बहुजन आघाडी नेहमी वंचितांच्या प्रश्नावर काम करत असते वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी रस्त्यावर तर कधी सभागृहात त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून शिरूर कासार तालुका वंचित बहुजन आघाडीने शालेय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन येथील संत वामनभाऊ विद्यालयातील विद्यार्थ्यांना काल शालेय साहित्य देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत औसरमल, पत्रकार संघाचे अध्यक्ष भारतकुमार पानसंबळ,पत्रकार सतिष मुरकुटे, प्रमोद निकम, महेश औसरमल वंचितचे सचिन यंकुळे हे होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन बडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन साबळे सर यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा