वाकडच्या भूमिपुत्राने रचला इतिहास १२ वर्षात ६०० वेळा सिंहगड ट्रेक, प्रशांत विनोदे यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक




वाकडच्या भूमिपुत्राने रचला इतिहास
१२ वर्षात ६०० वेळा सिंहगड ट्रेक,
प्रशांत विनोदे यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक

मुळशी, १९ ऑगस्ट शाररीक तंदुरुस्ती बरोबरच जगण्याची योग्य दिशा मिळण्यासाठी सुरु केलेल्या सिंहगड ट्रेक १२ वर्षात ६०० ट्रेक पूर्ण करणारे वाकडचे भूमिपुत्र प्रशांत विनोदे यांचे सर्वत्र कौतुक होत असून सिंहगड परिवार, सह्याद्री ट्रेकर्स व वृक्षवल्ली परिवारा मार्फत नुकताच सत्कार करण्यात आला.

प्रशांत विनोदे यांनी २०१० मध्ये सिंहगड ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. या बारा वर्षांत त्यांनी मित्राच्या बरोबर ६०० ट्रेक पूर्ण केले. तसेच ट्रेकिंग बरोबरच मॅरेथॉन धावणे, नविन नविन ठिकाणी पर्यटन करण्याचा छंद जडला त्यातुनच पुढे याच वर्षी एवेरेस्ट बेस कॅम्प सारखा खडतर ट्रैक अर्धागिनीला घेऊन पूर्ण केला, जवळ जवळ ३७ मॅरेथॉन पूर्ण केल्या. ५३ किलोमिटरची एसआरटी मॅरेथॉन केली. ४२ किलोमिटर, २० हाफ, २१ किलो मिटरच्या व इतर २ पूर्ण केल्या चारधाम यात्रा केली.

हिमालयातील केदारकंठ ट्रेक, गोमुख, अमरनाथ यात्रा २ वेळा पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड पदभ्रमंती ६ वेळा रायगड ४ वेळा तोरणा ४ वेळा, हरीशचंद्र गड २ वेळा, कळसूबाई शिखर २ वेळा किल्ले खांदेरी व उंदरी किल्ले रोहीडा. रायरेश्वर, जळगड किल्ले रांगणा किल्ले तुंग, किल्ले तिकोणा, किल्ले लोहगड, किल्ले विसापुर असे ६०० वा ट्रेक पूर्ण करताना सिंहगड ट्रेकर्सचे मार्गदर्शक अरुणमामा बोरकर, पोपट कलाटे, विजय घाडगे तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे दिपक बुचडे, योगेश गायकवाड, काळुभाऊ दिसले, सुधीर रानवडे, संतोष बुचडे (सिनियर), संतोष बुचडे (ज्युनियर), दूध वल्ली परिवाराचे ऋशीकेश पाटील, अजय मुगडे, सिहगड परिवारातील जुगल राठी, लेकुरवाळे सर, मिलिंद मराठे, गिरीश कुलकर्णी, मनिष मोटा, निलेश बच्चेवार, सिद्धेश मेनकुदळे, भरत भोसले, शैलेश सुपेकर, पुष्कराज कोरे, राजेश खाटपे, चंद्रकांत शिंदे भरत, दिवतकर सर, मोरे सर आणि पुर्ण सिंहगड परिवार उपस्थित होता.

भिमाशंकर ट्रेक किल्ले जंजिरा किल्ले राजगड ४ वेळा, कोराईगड, सादण व्हॅली, रतनगड, किल्ले वासोटा व नागेश्वर २ वेळा, राजगड ते तोरणा ट्रैक, किल्ले हरिहर किल्ले पुरंदर किल्ले शिवनेरी ४ वेळा किल्ले चाव भोरगिरी, भिमाशकर ट्रैक, किल्ले रेवदंडा, किल्ले राजमाची (श्रीवर्धन व मनरंजन), पद्मदुर्ग (कासा किल्ला), किल्ले प्रतापगड, धनगड, मल्हारगड, आदरबन ट्रेक, कोलई किल्ला, नाणेघाट व जीवधन गड, सिंधदुर्ग किल्ला, घोसाळगड, अवचितगड, सुधागड धर्मवीर गड (बहादुरगड) पेडगावचा किल्ला, सरसगड, उबरखिंड, कमळगड ढाकभैरी ट्रेक, किल्ले हडसर किल्ले निमगीरी, किल्ले हणुमंतगड, किल्ले हिंदोळा, गोव्यातला किल्ले फोंडा ३ वेळा, नळदुर्ग, सज्जनगड, अजिंक्य तारा, वसंतगड, दुधसागर २ वेळा, नादागिरी, जरडेशन, राजस्थानातील पाहीलेले किल्ले मेहरानगड, गोल्डन फोर्ट, जुनागड फोर्ट, नहारगड फोर्ट, अजमेर फोर्ट, चित्तोडगड, कुम्भलगड, उत्तर प्रदेशातील किल्ले झांसीचा किल्ला. तामिळनाडूतील किल्ले वैल्लोरचा किल्ला, किल्ले जिजी, कृष्णगौरी किल्ला, कर्नाटक-चित्रदुर्ग, मिरजान फोर्ट, मेडीकेरी फोर्ट, परदेशातील किल्ले युरोपातील प्रागचा वेस्टल, भुतान मधील पारोचा फोर्ट, पुनाका फोर्ट, पर्यटन भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू पोन्डिचेरी, केरळ, उत्तरांचल, जम्मु काश्मिर, गोवा, परदेश पर्यटन स्वझरलंड, जर्मनी २ वेळा, ऑस्ट्रेलिया, हॉलड २ वेळा, चेक रिपब्लिक, दुबई, थायलंड २ वेळा, मलेशिया, सिंगापुर, भूतान, नेपाळ असे देश विदेशातील पर्यटन
व ट्रैकिंग असा प्रवास त्यांनी केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा