रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या




बीड : जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकाचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही मध्येच कामावरून कमी करून गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत आहे. हा आमच्यावर अन्याय असून तो दूर करावा. अन्यथा या कंत्राटदाराच्या त्रासापायी आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करू नका, असा इशारा या चालकांनी प्रशासनाला दिला आहे. चालकांचा हा संताप पाहून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची दुपारी भेट घेऊन समजूत घातली तसेच त्यांना विविध संघटनांनी पाठिंबाही दिल
पूर्ण वेतन शासननिर्णयानुसार देण्यात यावे, कंत्राटदारामार्फत होणारी पिळवणूक थांबवावी, एकाही वाहनचालकाला कमी करू नये, मासिक पगार 1 ते 10 तारखेच्या आत द्यावा, अपघाती विमा 10 लाख रुपये देण्यात यावा, ॲडव्हान्स कंपनीवर मागण्या मान्य न केल्यास कारवाई करावी, ठेकेदार पद्धत बंद करून एनएचमधून वाहनचालकांना नियुक्ती द्यावी, अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातून वाहनचालक आले होते तसेच दुपारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्या समजून घेतल्या. त्यांच्यासमवेत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख हे होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा