बैलगाडी- दुचाकीचा भीषण अपघात, दोन चिमुकल्यांसह चार जखमी




बैलगाडी- दुचाकीचा भीषण अपघात
दोन चिमुकल्यांसह चार जखमी
शंकर शिंदे – तलवाडा
शेतातील कपाशीला पाळीचे काम उरकुन बाळु शाहादेव पवार हे रा.राजुरीमळा तलवाडा बैलगाडीने घरी राजुरी मळा येथे जात होते . घराजवळ बैलगाडी आली असता पाठीमागून भरघाव वेगाने येणा-या मोटारसायकलने बैलगाडीस जोराची धडक दिली. ही घटना दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
सदर धडक एवढी जोरात बसली की बैलगाडी , बैलासह रोड सोडुन खड्डयात जाऊन पलटी झाली.
बैलगाडीत असणा-या महीलेसह दोन लाहाणं मुले गाडी खाली ‌दबले होते. त्यांना वस्तीवरील लोकांनी ताबडतोब बाहेर काढले .
बैलगाडी मधील जखमी महिला संगीता बाळु पवार रा.राजुरी मळा व मोटारसायकल वरील जखमी व्यक्तीस ताबडतोब तलवाडा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा