कवडगाव मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती




कवडगाव मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेयांच्या १०२ व्या जयंतीला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा- बबन मांजरे,सुभाष साळवे
वडवणी l
वडवणी तालुक्यामध्ये कवडगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे आयोजन सार्वजनिक जयंती उत्सव समिती कवडगाव यांनी केले आहे. दिनांक २८-०८-२०२२  रोजी सकाळी ९:३० वाजता वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद कांगुणे व वडवणी तहसीलचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. तसेच दुपारी ०४ वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. तर संध्याकाळी ६:३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांची खास उपस्थिती असणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, बाबुराव पोटभरे, रवींद्र दळवी, अजिंक्य चांदणे, जयसिंग सोळंके, अॅड आनंद काळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या जयंतीला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन मानवी हक्क अभियानचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव मांजरे, माजी सरपंच सुभाषराव साळवे व कवडगाव ग्रामस्थांनी केले आहे. सविस्तर वृत्त असे की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे मौजे कवडगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड {जिजा} हमेशा म्हणायचे जो समाज संघटित नाही त्या समाजाला भविष्य नाही म्हणून समाज संघटित झाला पाहिजे. जयंतीच्या माध्यमातून वैचारिक विचाराची देवाण-घेवाण झाली पाहिजे यासाठी जयंती असते. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता अहिल्या, माता रमाई, माता भिमाई यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन होते. आणि याच समाजप्रबोधनामधून नवीन पिढीला महापुरुषांनी दिलेल्या विचार मंत्राचा साक्षात्कार होतो यासाठी जयंती करायची असते.दिनांक २८ ला रात्री ठिक ८:३० वाजता सुप्रसिद्ध गायिका पंचशीला भालेराव आणि त्यांचा संच यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी वडवणी तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुजन समाज बांधवाने या जयंती सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे असे आवाहन या जयंती कमिटीचे आयोजक सार्वजनिक जयंती उत्सव समिती कवडगाव यांनी केले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा