साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बाहेगव्हाण जयंती कमिटीने पसायदान सेवा प्रकल्पाला अन्नदान




वडवणी l
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त बाहेगव्हाण येथील तरुणांनी मिरवणूक न काढता तोच खर्च वाचवून अनाथ मुलांचे आश्रम डेक्कन मोह येथे पसायदान सेवा प्रकल्पाला अन्नदान व फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मयूर बडे, प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे, पत्रकार सतीश मुजमुले, माजी सरपंच नागेश शिंदे, वैभव नागरगोजे, भालेराव दादा मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे, जिल्हा सचिव सचिन कसबे, बळी उजगरे, शेख सलीम, अमोल मैंदेकर, शिवाजी कसबे, कैलास उजगरे, एन डी साळवे, सुनील कसबे, मसू कसबे, सोपान उजगरे, विजय कसबे, सुरज कसबे, किरण कसबे, भाऊसाहेब मोमीन, दगडू मोमीन, राजेभाऊ मोमीन, करण खंडागळे, तेजस मोमीन यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोडक्यात वृत्त असे की, वडवणी तालुक्यातील बाहेगव्हण येथे जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीनिमित्त तेथील तरुणांनी डीजे न लावता मिरवणूक कॅन्सल केलेली आहे. म्हणून हेच पैसे पसायदान सेवा प्रकल्पामध्ये अनाथ मुलांच्या भोजन व्यवस्थेसाठी व फळ वाटपासाठी वापरल्यामुळे वडवणी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बाहेगव्हाण जयंती उत्सव समितीचे अभिनंदन होत आहे. खरोखरच खूप मोठा उपक्रम या तरुणांनी हाती घेतलेला आहे. जे राजकीय पुढार्‍यांना जमलं नाही ते बाहेगव्हाण  येतील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीने करून दाखवले आहे.  हजारो लाखो रुपयांची उधळपट्टी न करता तेथील अनाथ मुलांच्या भोजनासाठी फळांसाठी त्या पैशाचा वापर केला. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा आदर्श घेण्याजोग काम आहे. प्रत्येक गावातल्या तरुणांनी या तरुणांचा आदर्श घेतला पाहिजे. जयंती म्हणजे नुसतं नाच गाणं नसून अनेक प्रकारचे उपक्रम राबवता येतात यालाच जयंती म्हणतात. मग जयंती कुठल्याही महापुरुषांची असो ती नाच गाणं न करता उपक्रमाने साजरी झाली पाहिजे. तरच व्यसनाधीन झालेली तरुण पुन्हा या वैचारिक विचाराच्या चळवळीमध्ये सहभागी होतील अन्यथा ही परंपरा अशीच कायम राहिली तर भविष्यातली पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही याचं भान आता तरुणांनी ठेवलं पाहिजे. अनेक राजकारणी लाखो रुपये हजारो रुपये फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये घालवतात परंतु पसायदान सेवा प्रकल्पाला १००० रुपये देण्याची दानत नाही. पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे यांनी शोकांतिका व्यक्त केली बीड जिल्ह्यातील एकाही राजकारण्यांनी पसायदान सेवा प्रकल्पला भेट दिली नाही. किंवा या मुलाबाळाबाबत विचारपूस केली नाही. फार मोठी शोकांतिका आहे. ऊसतोड मजुरांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो सर्वसामान्य माणूस करतो ते कुणीच करत नाही हेच या बाहेगव्हाणमधल्या जयंती कमिटीने केलेल्या कामावरून दिसून येतं.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा