अमृत सारडा यांच्या संकल्पनेतून मोफत पाणी पुरवठा




  • बीड ! पेठ बीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड न.प.चे माजी उपाध्यक्ष श्नी. अमृत  काका) सारडा यांच्या पाणी जिवन आहे या संकल्पनेतून दरवर्षी ऊन्हाळ्यात पेठ बीड भागात मोफत पाणी पुरवठा केला जात असून या अभिनव उपक्रमाची व्याप्ती शहरात वाढवून सध्या सुुुरू असलेला कडक उन्हाळा व कोरोणा महामारी लक्षात घेेवूूून नागरिकांच्या मागणीप्रमाणे पेेेठ बीड सह शहराच्या विविध भागातील नागरिकांना टँकरद्वारे घरपोच मोफत पाणी पुरवठा करण्यात येत असून ज्या भागात पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे त्यांनी खालील दिलेल्या मो. क्र.वर संपर्क साधावा तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पेठ बीड शहर विकास कृती समिती बीडचे संस्थापक / अध्यक्ष तथा बीड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अमृत (काका) सारडा व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
    पेठ बीड कृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पेठ बीडसह शहरातील विविध भागात टँकरद्वारे मोफत घरपोच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरातील ज्या भागात घरपोच मोफत पाणी पुरवठा टँकरची आवश्यकता आहे त्या भागातील नागरिकांनी पेठ बीड शहर विकास कृती समितीचे सुरेश बन्सोडे मो.नं – ८७६६८०८०३६ , राणा चौव्हाण – ९३०३९४९४९४, जयंत राऊत – ९४०५४५४२१९, लक्ष्मण शेनकुडे – ९४२१३३५९६७, महेबुबखान – ९८२२६७०२२९, विलास बामणे – ९८९०२८७०८७, नितीन इगडे – ७०२०१४२८२९, शेख खलील – ९६७३१४५०८०, नितीन साखरे – ९४०५४५८५४५ या नंबरवर संपर्क साधावा.
    पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या वतीने शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून व सोशल डिस्टंसिंग ठेवून घरपोच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मोफत पाणी पुरवठा टँकरने संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत पेठ बीडसह शहराच्या विविध भागातून नागरिकांच्या मागणी प्रमाणे मोफत पाणी टँकरने वाटप करण्यात येणार असून रमाई नगर (खंडेश्वरी परिसर), पुरग्रस्थ काँलनी, पांगरी रोड, गढी गल्ली मोची गल्ली, जुना मोंढा, तेलगांव रोड परिसरातील भागासह शहरातील अनेक भागात मागणी प्रमाणात पाणी पुरविण्यात येत असल्याचे पेठ बीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक -अध्यक्ष तथा न.प.बीडचे माजी उपाध्यक्ष अमृत काका  सारडा यांनी सांगितले. या मोफत पाणी पुरवठा टँकर योजनेचा नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून तसेच शांततेचे पालन करून अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पेठ बीड शहर विकास कृती समिती बीडच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा