डॉ प्रमोद शिंदे राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानीत




 

बीड

महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रमोद शिंदे यांना अस्थिरोग संघटनेच्या गोवा येथील वार्षिक अधिवेशनामध्ये उपाध्यक्ष पदावरील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. वेद प्रकाश मिश्रा ,भारतीय अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.रमेश सेन,राष्ट्रीय सचिव डॉ.नवीन ठक्कर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.वासुदेव गाडेगोने राज्य सचिव डॉ.नारायण कर्णे आदी मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा ताज हॉटेल,गोवा येथे संपन्न झाला.सर्व मान्यवरांनी डॉ.प्रमोद शिंदे यांचा कार्याचे कौतुक केले आणि त्यांनी संघटनेसाठी केलेल्या कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.डॉ.प्रमोद शिंदे यांनी संपादित केलेल्या एम ओ ये बुलेटिन या अंकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले. तसेच बीड अस्थिरोग संघटनेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड सलग दुसऱ्या वर्षी मिळाला.या यशाबद्दल डॉ.प्रमोद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .महाराष्ट्र अस्थिरोग संघटना स्थापना दिन, बोन अँड जॉइंट डे,बुलेटिन संपादक,अनेक सी एम ई , वर्कशॉप्स,आदी प्रोजेक्ट विशेष कार्य केल्याबद्दल हा गौरव पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी बीड अस्थिरोग संघटनेला वर्षभर राबविलेल्या उपक्रमामुळे बेस्ट ब्रांच अवॉर्ड सलग दुसऱ्या वर्षी मिळाला.या यशाबद्दल डॉ.प्रमोद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बीड अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण देशमुख,सचिव डॉ सुरेश मुंडे,डॉ. टी. एल देशमुख,डॉ.भोरे,डॉ.क्षीरसागर व्ही .एस,डॉ अंशुमन बहिर,डॉ.धायतडक,डॉ.
कोटेचा,डॉ.गवते, डॉ.अमोल गीते,डॉ. अळणे,डॉ.प्रशांत सानप,डॉ.आनंद वैद्य,डॉ..अभिनव जाधव,डॉ कट्टे,डॉ. बायस, डॉ सचिन देशमुख,डॉ.विशाल कले,डॉ.सुनील गायकवाडआणि सर्व अस्थिरोग तज्ञ यांनी अभिनंदन केले आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा