नुजिवुड सिड्सच्या वतीने बेलोरो येथे कापुस पीक पाहणी कार्यक्रम संपन्न




नुजिवुड सिड्सच्या वतीने बेलोरो येथे कापुस पीक पाहणी कार्यक्रम संपन्न
दिंद्रुड !
बियाणे कंपनी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नुजिवुड सिड्स कंपनीने एनसीएस ९०११ हे कपाशीचे वान शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर आहे. या वानाला किती कापसाचे बोंडे लागतात. हे शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी या कंपनीने बेलोरा येथे आयोजित केलेल्या पीक पाहणी कार्यक्रमास कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत. या वानाला आपली पसंती दिली.या मेळाव्यास परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
बियाणे क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नुजिवुड सिड्स कंपनीचे एनसिएस 9011 हे वान शेतकऱ्यांसाठी सन २०२० पासून उपलब्ध झालेले आहे. या वाणाचा प्रगती दर चांगला असून ,माजलगाव तालुक्यात जवळपास ३००० हेक्टर लागवड शेतकऱ्यांनी या वाणाची केल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.माजलगाव तालुक्यातील बेलोरा शिवारात शेतकरी प्रकाश फपाळ व दत्ता फपाळ यांच्या शेतात आशा बी टी 2 या नुजिवुड कंपनीच्या पीक पाहणीचा कार्यक्रम गुरुवारी सकाळी घेण्यात आला. परिसरातील जवळपास ८०० ते १००० शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते. सन २००० साली ८०० बॅग तालुक्याला उपलब्ध करण्यात आल्या होत्या. आता मागणी वाढल्याने जवळपास १६००० बॅग वितरित करण्यात आल्याचे कंपनीद्वारे सांगण्यात आले. प्रति कापसाच्या झाडास जवळपास ८० ते १२५ बोंड लागत असून या वानाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात होते.या पीक पाहाणी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनीचे उपमहाव्यवस्थापक एस.पीक.पवार, जय महेश शुगरचे कार्यकारी संचालक पारसनाथ जैस्वाल, जय महेशचे ऊस पुरवठा अधिकारी एस.व्ही.पवार ,कंपनीचे विभागीय व्यवस्थापक रावसाहेब बोंडवे आदि होते.यावेळी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना या कपाशी वाना बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून, हे वान कमी कालावधीत, जास्त सहा ग्राम वजनाचे बोंड याची लागवड जिरायती क्षेत्रात ४×२ अंतरावर तर कोरडवाहु शेतात ४×१अंतरावर याची लागवड करावी.शेतकऱ्यांसाठी हे वान फायदेशीर असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास परिसरातील शेकडो शेतकरी, सरपंच उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नुजिवुड सिड्स कंपनीचे अशोक गायकवाड, दताञ्य पवार, अभिजित भोसले,मनोहर डाके, प्रदिप ठोंबरे आदिंनी परिश्रम घेतले.
*चौकट*
*नुजिवुड सिड्स शेतकऱ्यांच्या हिताची =प्रकाश फपाळ*
नुजिवुड सिड्स कंपनीने ९०११ उपलब्ध केलेले कपाशी वान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून,याचे कपाशीचे चांगले मजबूत खोडाचे असुन, यास १२५ पेक्षा जास्त बोंडे येतात. शिवाय ते वेचणीसाठी सोपे असुन, कापुस वजनदार असल्याने हे वान


शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे कापुस उत्पादक शेतकरी प्रकाश फपाळ यांनी सांगितले.


 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा