मुख्याधिकाऱ्यानी जबाबदारीने काम करावे – मस्के , शिराळे  




.ने नागरीकांना मुलभूत सुविधा दिल्याच पाहिजेत – राजेंद्र मस्के

बीड

मागील काही वर्षापासून बीड शहराची दयनीय अवस्था चालू आहे. एकशे पंधरा कोटींची अमृत पेय जल योजना शहराला मिळूनही  अद्याप नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यास नगरपालिका व संबंधित प्रशासन अपयशी ठरले आहे. नगरपालिकेचा कारभार प्रशासक आणि मुख्याधिकारी अशा सक्षम अधिकाऱ्याकडे असूनही नगरपरिषद कारभारात लोकाभिमुख काम करण्यास धजावत नाही. अधिकाराचा पूर्ण वापर करून, अधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा दिल्याच पाहिजेत. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

 नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेचा ढेपाळलेला कारभार दुरुस्त केला पाहिजे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय ठेऊन शहराची स्वच्छता, पथदिवे यासारखे दैनंदिन प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. राजकीय भेदाभेद न करता नि:पक्षपणे शहरवासीयांची सेवा केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने असे घडत नाही. किमान यापुढे तरी सिओंनी कर्तव्याची जाणीव ठेऊन जबाबदारीने काम करावे असे सडेतोड मत भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांनी व्यक्त केले.

आज भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नवनाथ शिराळे, अजय सवाई, डॉ.लक्ष्मण जाधव, दीपक थोरात, भूषण पवार, पंकज धांडे, शाम हुले, यांनी बीड शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचे तातडीने निवारण करण्यात यावे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,

मुख्याधिकाऱ्यानी जबाबदारीने काम करावे  – नवनाथ शिराळे  

बीड नगर परिषदेने बीड शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील रस्ते,गटारी,कचराकुंड्या याचे सर्वत्र अस्वच्छता व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ना दुरुस्त रस्ते यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले तर, धुळीमुळे  श्वषनाचे व मणक्याचे आजार वाढले आहेत. मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना आजही पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी मिळते. गेली कित्येक वर्षापासून पाण्यासाठी जनतेच्या हाल अपेष्टा चालू आहेत. अटल अमृत जल योजना तातडीने कार्यान्वित करू, दैनंदिन पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.

शहरातील गटार, रस्ते, कचराकुंडी, आदिसह शहराची नियमित  स्वच्छता करण्यात यावी.,घंटागाडीची वार्डनिहाय सोय करण्यात यावी.,किमान आठवड्यातून तीन वेळा नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करावा.,रस्त्यावरील अडथळा निर्माण करणारे  विद्युत  पोल व डीपी हटवण्यात यावी.,शहरातील सर्व भागात आवश्यकतेनुसार पथदिवे तातडीने बसवण्यात यावे.,शहरातील चौकांचे सुशोभीकरण व स्वच्छता नियमित करण्यात यावी.,शहरात नव्याने मंजूर झालेली सत्तर कोटीची कामे गुणवत्ता पूर्वक मुदत्पुर्वक  करणे बाबत. तसेच रोड च्या बाजूला चार इंची पीव्हीसी पाण्याचे नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी तरतूद करण्यात यावी.तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याची रुंदी कायम ठेऊन कामे पूर्ण करण्यात यावीत.,पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजना लाभार्त्यांना तात्काळ मजुरी देऊन धनादेशाचे वाटप करण्यात यावे. .शहरातील महत्वाच्या चौकातील  सीसी टीव्ही दुरुस्ती करण्यात यावी,छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण  (मल्टी पर्पज ग्राउंड )मध्ये विद्युत रोषणाई व पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा