बीड-पिंपळनेर रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे;निधी लाटण्याचा कंत्राटदाराचा डाव !




बीड-पिंपळनेर रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे;निधी लाटण्याचा कंत्राटदाराचा डाव !

बीड : बीड-पिंपळनेर मार्ग क्र.५५ हा गेल्या सात वर्गापासून दयनीय अवस्थेत आहे, रस्ता खड्डेमय झालेला आहे, बीड पिंपळनेर हा रस्ता तब्बल ३० खेड्यागावांना जोडणारा आणि दळणवळणाच्या मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवाशी रहदारी करतात, प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या मणक्याच्या आजार जडला आहे,काही लोक अपघातात दगावले आहेत तर काही अपंग होऊन कायमचे घरी बसले आहेत.
लोकप्रतिनिधीनी अनेकवेळा या रास्तूच्या कामचं उदघाटन केलं मात्र रस्ता झाला नाही, या रस्त्यासाठी अनेकवेळा तरुण रस्त्यावर आले, अनोदोलनं केली त्याच्या दीर्घकाळानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तब्बल सात वर्षांनंतरत या रस्त्याचे काम सुरू झाले आहे खरे मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.

रस्त्यावर खाडी अंथरली जात आहे मात्र खाली डांबरचा नुसता फवारा मारला जातोय,पोतारा फिरवला जातोय रस्त्यावर अंथरलेली खडी हाताने बाजूला निघत आहे चिटकून राहत नाही कारण डांबर टाकलेच जात नाही.
होत असलेले काम दर्जेदार नसल्याने पुढील सहा महिन्यात रस्त्याचे तीन तेरा वाजतील त्यामुळे रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी वाहन धारकांकडून केली जात आहे.

विशेष म्हणजे रस्त्याचे काम सुरू असताना बांधकाम विभागाचा एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता बहिर नावाचे एक कर्मचारी तिथे उपस्थित होते मात्र ते म्हणाले आमच्या नियमाप्रमाणे उत्तम काम सुरू आहे असे अकलेचे तारे त्यांनी तोडले त्यामुळे अधिकारी पगार शासनाची घेतात आणि काम कंत्राटदाराचं करतात अशा अधिकाऱ्यांना थेट घरी बसवा अशी मागणी उद्या नागतिक करणार आहेत.
दरम्यान रस्त्याचं काम दर्जेदार झाल नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सामान्य नागरिकांना दिला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा