चौसाळा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न , सर्व उमेदवारांनी व पॅनल प्रमुखांनी दिले शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन




चौसाळा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न ,
सर्व उमेदवारांनी व पॅनल प्रमुखांनी दिले शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन
चौसाळा ( प्रसाद देशमुख ):- चौसाळा पोलीस चौकीच्या वतीने शांता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस नेकनूर पोलीस स्टेशनचे सपोनी विलास हजारे यांनी सर्व पॅनल प्रमुखांना व उमेदवारांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना विलास हजारे यांनी सांगितले की चौसाळा हे तसे शांतता प्रिय गाव आहे चौसाळा येथे अंदाजे 52 उमेदवार रिंगणात असून त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे गावात काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने चौसाळा पोलीस चौकीच्या वतीने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा,सरपंच पती मधुकर तोडकर ,बाबुशेठ लोढा,श्रीमंत सोनवणे ,शकूर भाई सौदागर ,नंदू आबा जोगदंड,सुधाकर गुंजाळ ,विजय राजे शिंदे ,पीएसआय पान पाटील ,चौसाळा पोलीस चौकीचे जमादार बाबासाहेब डोंगरे ,हेड कॉन्स्टेबल तांबे,चालक घुले तसेच सर्व कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद देशमुख ,मिराज मुलाने ,प्रकाश व्यवहारे उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा