धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चे उमेदवार सुलभा जोगदंड यांच्या प्रचाराचा शुभारंभ




धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चे उमेदवार सुलभा जोगदंड यांच्या प्रचाराचा शुभारंभ
चौसाळा (प्रतिनिधी )चौसाळा शहरांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीने चांगलीच रणधुमाळी पकडली असून चौसाळा शहर विकास आघाडी ,चौसाळा ग्रामविकास पॅनल व युवक क्रांती पॅनल या तीनही पॅनलच्या विरोधात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चे उमेदवार सुलभा सतीश जोगदंड यांनी दंड थोपटले असून सरपंच पदासाठी त्या लढत देत आहेत आज दिनांक 11 रोजी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या उमेदवार सुलभा सतीश जोगदंड यांनी चौसाळा येथील सर्व ग्रामदेवतांना नारळ फोडून व चंदनशहावली दर्ग्यावरती चादर चढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला चौसाळा शहरात सद्यस्थितीला तीन तुल्यबळ पॅनल असून यामध्ये चौसाळा शहर विकास आघाडीचे उमेदवार मंगल प्रेमचंद लोढा ,चौसाळा ग्रामविकास आघाडीचे उमेदवार शोभा संचित माने ,चौसाळा युवक क्रांती पॅनलचे उमेदवार शिंदे ऐश्वर्या विजय यांच्या विरोधामध्ये सुलभा सतीश जोगदंड या शिट्टी या चिन्हावर स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावत आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा त्यांनी दिला असून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सतीश जोगदंड ,अंकुश नाना जोगदंड ‘अशोक जोगदंड,शेख अफसर ,श्रीमंत नाईकवाडे ,सुरज जोगदंड तसेच अनेक मान्यवर ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा