धनादेश न वटले प्रकरणी आरोपीस एक वर्षे शिक्षा




 

  • धनादेश न वटले प्रकरणी आरोपीस एक वर्षे शिक्षा व पाच लाख दंड

बीड

आरोपी सुदेश बन्सीलाल परदेशी यांनी फिर्यादी नामे विठ्ठल रामकृष्ण आतकरे यांचे कडून २०१६ मध्ये घर बांधकामासाठी रक्कम रुपये २,५०,०००/- रुपये हात उसणवार तीन महिने मुदती करिता घेतले होते. आरोपीने तिन महिन्याची मुदत संपले नंतर हातऊसणवार घेतलेली रक्कम २,५०,०००/- रुपये हे परत रोख फिर्यादीस दिले नाहीत. परंतु आरोपीने त्यांचे खाते असलेला स्टेट बँक ऑफ हैद्राबाद नविन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कृशी शाखा बीड येथील रक्कम रु. २,५०,०००/- चा धनादेश फिर्यादीस दिला होता. सदर धनादेश फिर्यादीने त्याचे खातेवर वटणेसाठी टाकला असता तो आरोपीचे खातेवर पुरेशी रक्कम शिल्लक नाही, या कारणास्तव रिटर्न मेमो सह बँकेने फिर्यादीस परत दिला असता फिर्यादीने आरोपीस रक्कम मागणी बाबत वकीला मार्फत नोटीस पाठवूनही मुदतीत रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादीने कलम १३८ नि.ई. अॅक्ट प्रमाणे आरोपी विरुध्द मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, बीड यांचे न्यायालयात कारवाई दाखल केली होती. सदरील प्रकरणात फिर्यादी तर्फे एकूण पाच साक्षीदाराची साक्ष नोंदवली होती. फिर्यादी तर्फे दिलेला साक्षी पुरावा व कागदोपत्री पुरावा ग्राह्य व फिर्यादी तर्फे अॅड. निळकंठ अर्जुनराव बारगजे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, बीड यांनी आरोपीस एक वर्ष शिक्षा व रक्कम ५,००,०००/- (पाच लक्ष रुपये) दंड व दंडाची संपूर्ण रक्कम वसुल होईपर्यंत त्यावर ९% व्याज देण्याचा आदेश पारीत केला आहे. सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे अॅड. निळकंठ अर्जुन बारगजे यांनी काम पाहीले, त्यांना त्यांचे सहकारी अॅड. एस. बी. खाडे यांनी सहकार्य केले व अॅड. नारायण भानुदास लोणकर यांनी मार्गदर्शन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा