गावठी पिस्तुलासह दहशत पसरविणरार्‍या तरुणाचा जामीन मंजूर – अ‍ॅड. गोविंद शिराळे




गावठी पिस्तुलासह दहशत पसरविणरार्‍या तरुणाचा जामीन मंजूर – अ‍ॅड. गोविंद शिराळे

बीड (प्रतिनिधी)ः- दि.28 डिसेंबर 2022 रोजी गावठी पिस्तुलासह दहशत निर्माण करणार्‍या आरोपीला शिवाजी नगर ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने जेरबंद केले होते. सदरील कारवाई ही दि. 28 डिसेंबरच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहरातील अंबिका चौक परिसरात करण्यात आली होती.
सुधीर हनुमान वाघमारे (वय 21 वर्षे रा.अंबिका चौक बीड) असे आरोपीचे नाव आहे तो अंबिका चौका जवळील एका लॉन जवळ गावठी पिस्तुलासह दहशत निर्माण करत असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीसांना मिळाली. त्यावरुन गुन्हे प्रगटीकरण पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गावठी बनावटीची पिस्तुल व दोन काडतुसे आढळली. सदरील पिस्तुल व काडतुसे जप्त करुन सुधीर हनुमान वाघमारे याच्यावर फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा र.नं.562/2022 भारतीय हत्यार कायदा 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार 135 शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान दि.29 डिसेंबर 2022 रोजी मा.न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी तर दि. 30 डिसेंबर 2022 रोजी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सदर आरोपीच्या वडीलांचे शपथपत्र जामीन नामंजूर करणे बाबत दाखल झाले होते. मा.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी सदरील आरोपीचा जामीन नाकारला होता. सदर नाराजीतून आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या न्यायालयात जामीनासाठी दि.10 जानेवारी 2023 रोजी अ‍ॅड.गोविंद नवनाथ शिराळे यांच्या मार्फत फौजदारी जामीन अर्ज क्र.32/2023 दाखल केला होता. सदर जिल्हा व सत्र न्यायालयातही आरोपीच्या वडीलांचा जीवास धोका असल्या बाबत तसेच आरोपीचा जामीन नामंजूर करणे बाबत शपथपत्र दाखल केलेले होते. परंतु अ‍ॅड.गोविंद नवनाथ शिराळे यांनी केलेला युक्तीवाद, मुंबई उच्च न्यायालयाने न्यायनिवाडे तसेच आरोपीच्या वतीने केलेला बचाव ग्राह्य धरुन मा.जिल्हा व सत्र न्यायाधिश बीड यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने अ‍ॅड.गोविंद नवनाथ शिराळे यांनी काम पाहिले व त्यांना अ‍ॅड.गीता वझे, अ‍ॅड.सोनम कदम-शिराळे, अ‍ॅड. मंदा संपकाळे, अ‍ॅड.मिरा सवई, अ‍ॅड.पंकज रायभोळे यांनी सहकार्य केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा