हिटरचा करंट लागल्याने पती- पत्नीचा मृत्युव




केज : तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे ) येथील पती, पत्नीचा पाणी तापविण्याच्या हिटर मधून बसलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (वय 50) आणि पत्नी इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (वय 45) नित्येनियमाने पहाटे 4 वाजता झोपेतून उठले असता पत्नी इंदुबाई ही पाण्याचे हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे गेली असता तीला विजेचा धक्का बसला हे लक्षात येताच ज्ञानेश्वर तीला वाचविण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि पती, पत्नीचा यातच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे घटना स्थळी दाखल झाले आणि या घटनेचा पंचनामा करून दोघांचेही पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. सुरवसे यांच्या पश्चात एक मुलगा आणि वयोवृद्ध आई आहेत. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वीचे 2 आघात
ज्ञानेश्वर सुरवसे यांना 3 मुली आणि 1 मुलगा असे 4 अपत्य होते. पैकी मुलगा बीडला शिक्षण घेतो आहे. एका मुलीचा विवाह झाला असून,12 वर्षांपूर्वी 1 मुलगी पाण्यात बुडून मृत्यू पावली होती, तर दुसरीने 5 वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा