धक्कादायक! ‘चांगले मार्क्स देईन…’; महिला टीचरचा 16 वर्षांच्या मुलावर बलात्कार!




धक्कादायक! ‘चांगले मार्क्स देईन…’; महिला टीचरचा 16 वर्षांच्या मुलावर बलात्कार
‘डेलीस्‍टार’च्या वृत्तानुसार, ऑक्‍टोबर 2022 मध्ये लेना स्‍टेवार्टने आपल्या मित्राच्या घरी विद्यार्थ्यावर दोनवेळा बलात्कार केला होता. पहिल्यांदा विद्यार्थी गडबडला होता.
एका महिला टिचरने ‘गुरु-शिष्‍य परंपरे’च्या नात्यालाच काळीमा फासल्याची घटना घडली आहे. या शिक्षिकेने संबंधित विद्यार्थ्याला चांगले मार्क देण्याचे आमिष दाखवत त्याच्यावर दोन वेळा रेप केल्याची घटना घडली आहे. या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षिकेने आपल्या मित्राच्या घरात संबंधित विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले. ही घटना अमेरिकेतील मिसौरी येथे घडली.
येथील 26 वर्षीय शिक्षिका लेना स्‍टेवार्ट (Lena Stewart) हिच्यावर सेक्‍सुअल कॉन्‍टॅक्‍ट आणि सेक्‍सुअल मिसकंडक्‍टच्या तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. KY3 न्‍यूज चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, लेना स्‍टेवार्टने ऑक्‍टोबर 2022 मध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्यावर बलात्कार केला होता.

संबंधित शिक्षिका लेना स्‍टेवार्ट विद्यार्थ्याला, जर तो तिची सेक्‍सुअल डिमांड पूर्ण करत राहिला तर चांगले मार्क्स देईन, असे आमिष दाखवत होती, असे तपासातून समोर आले आहे. एवढेच नाही, तर यामुळे टीचर वर्गातही आपल्याला सॉफ्ट कॉर्नर देत होत्या आणि जास्त होमवर्कदेखील देत नव्हत्या, असा दावाही संबंधित विद्यार्थ्याने केला आहे.
‘डेलीस्‍टार’च्या वृत्तानुसार, ऑक्‍टोबर 2022 मध्ये लेना स्‍टेवार्टने आपल्या मित्राच्या घरी विद्यार्थ्यावर दोनवेळा बलात्कार केला होता. पहिल्यांदा विद्यार्थी गडबडला होता. आपल्याला घरी जायचे आहे, असे त्याने शिक्षिकेला म्हटले होते. दुसऱ्या वेळा भेटले तेव्हा पुन्हा या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. आता लेना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा