अँड. देशमुख यांनी रोखलेल्या रेल्वे पुला संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे




अँड. देशमुख यांनी रोखलेल्या रेल्वे पुला संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

बीड

बीड जिल्ह्यात रेल्वेच्या कामा मध्ये प्रचंड अनागोंदी आहे. बीड पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चराटा फाट्याजवळ रेल्वेचा एक पुल बेकादेशीर तिने उभा करण्यात आला आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी अँड. अजित देशमुख यांनी या संदर्भात रेल्वे आणि बांधकाम विभागाला जाब विचारल्यानंतर या पुलाचे काम आज तागायत बंद आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हंटले आहे.

रेल्वे खात्याने या पुलाचे बांधकाम स्वतःच्या जागेत न करता मनमानी पद्धतीने बेकायदेशीर रीतीने अन्यत्र वळवले आहे. त्यामुळे हे ठिकाण अपघाताला निमंत्रण ठरत आहे. गेले कित्येक वर्षापासून पुलाचे काम तर झालेले नाही. मात्र वळवलेला रस्ता देखील प्रचंड प्रमाणात खराब झाला आहे.

या बेकायदेशीर पुलाचे काम जर झाले, तर रस्त्यासाठी पुन्हा पन्नास कोटी रुपयांची जमीन संपादित करावी लागेल. हा पैसा जनतेचा आहे. त्यामुळे आम्ही यात लक्ष घातले होते. आता देखील हा पूल रेल्वेच्या जागेतच व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे.

बीडच्या रेल्वे स्थानकासाठी संपादित होणाऱ्या सुमारे पाचशे साठ कोटी रुपयांच्या अतिरिक्त भूसंपादनाला आम्ही विरोध करून हे भूसंपादन रद्द केले होते. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी वाचला होता. याशिवाय रेल्वे खात्यात अनेक अनागोंदी कारभार चालू आहे.

रेल्वे लवकर यावी, यासाठी पोस्ट प्रयत्न होत नसले, तरी चालू असलेल्या कामातून कशी कमाई करता येईल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पुला संदर्भात बैठक घेताना रेल्वेच्या जागेतच पुल व्हावा, अशी भूमिका घेणे आवश्यक आहे. जर चुकीच्या पद्धतीने बांधलेला पूल कायम ठेवायचा म्हटलं, तर पन्नास कोटी रुपयांचे अतिरिक्त भूसंपादन देखील करावे लागणार आहे. याला संमती दिली तर मोठ्या रकमेचा गैरव्यवहार आणि गैरवापर होईल.

त्याचप्रमाणे हा पूल बांधताना रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतलेली नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांनी रेल्वे प्रशासनाला तीन पत्र दिले आहेत. मात्र एकाही पत्राचे उत्तर रेल्वे खाते द्यायला तयार नाही. याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधणे आवश्यक आहे. जर चुकीच्या पद्धतीने पूल झाला अथवा आहे त्या पुलाला मान्यता दिली तर गाठ आमच्याशी आहे, याचे गांभीर्य प्रशासनाने बाळगावे. रेल्वे आणि बांधकाम विभागाने कितीही साटे लोटे केले तरी देखील त्यांना उत्तर द्यावे लागेल, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

रेल्वे भूसंपादन संदर्भात आणि रेल्वेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आज आढावा बैठक आयोजित केली आहे. जवळपास दहा खात्याच्या अधिकाऱ्यांना यात बोलवले आहे. यावेळी या प्रश्नावर देखील चर्चा व्हावी, असे ही जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेतील अनागोंदीची माहिती ही त्यांना देण्यात आली असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा