भारत राष्ट्र समिती पक्षाची देशाला व महाराष्ट्राला नितांत गरज.




भारत राष्ट्र समिती पक्षाची देशाला व महाराष्ट्राला नितांत गरज..
————————–
KCR म्हणजेच भारतीय राजकारणातील महत्वाच तसेच यशस्वी नाव तेलंगणा राज्याचे मुंख्यमंत्री तसेच भारताच्या धरती वरील सर्वात जास्त विकास गंगा निर्माण करणार नेतृत्व म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांना KCR म्हणून ओळखले जाते. तेलंगणा राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) चे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले केसीआर तेलंगणा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. केसीआर यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५४ रोजी तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील चिंतामडाका गावात झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सिद्धीपेट येथे पूर्ण केले आणि नंतर हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली.

केसीआर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) चे सदस्य म्हणून केली होती. परंतु नंतर तेलंगणाचे वेगळे राज्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने २००१ मध्ये टीआरएसची स्थापना केली आणि ते वेगळे झाले. त्यांनी तेलंगणाच्या निर्मितीसाठी चळवळीचे नेतृत्व केले आणि २०१४ मध्ये राज्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून केसीआर हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना विविध कल्याणकारी योजना आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या प्रमुख “रयथू बंधू” योजनेसह राज्यात विकासात्मक उपक्रम राबविण्याचे श्रेय दिले जाते या मध्ये…
१) शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज.
२) पेरणीसाठी आगोदर १०,००० रु. एकरी मदत.
३) नदी जोड प्रकल्पामुळे १००% क्षेत्र सिंचनाखाली आणले.
४) शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्यास (अपघाती असो किंवा नैसर्गिक) कुटंबीयांना ५,००,०००/- रु. ची तात्काळ मदत. (आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त कुटुंबीयांना वितरीत)
५) सरकारची ७००० खरेदी केंद्रे आहेत त्या माध्यमातून स्वतः धान्य खरेदी करते.
६) दुःखद व आकस्मिक प्रसंगासाठी १००% प्रिमिअम देणारी विमा योजना सरकार स्वतः राबविते..
७) शेतकरी मंच योजनेद्वारे ५००० एकर चा एक समूह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो.
८) कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी १,००,१००/- रु. विना अट तात्काळ मदत करतात.
९) ज्येष्ठ नागरिकांना व एकट्या स्त्रियांना दर महिन्याला २०१६ रू. पेन्शन.
१॰) दिव्यांगासाठी दर महिन्याला ३०१६ रू. पेन्शन.
११) गरीब व गरजू लोकांना १००% अनुदानावर २ बेडरूम किचन घरे दिली जातात. (३ लाखाहून अधिक लोकांना लाभ)
१२) दलीत व आदिवासीनां उद्योग करणान्यांसाठी प्रोत्साहण योजना (आतापर्यंत ४७०८० उद्योजकांसाठी २१३९ कोटी वितरीत) १३) दलितांसाठी प्रत्येक कुटुंबासाठी विना परतफेड १० लाख रु. एक रकमी दिले जातात. (वर्ष २०२१-२२ मध्ये २९७०० लाभार्थी तर वर्ष २०२२-२३ मध्ये १,७५,००० लाभार्थी) १४) धनगर बांधवांसाठी पाळण्यासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात. १५) मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ, स्वच्छ व मुबलक पाणी.
१६) गरोदर व स्तनदा मातांसाठी मोफत ने आन व सर्व आरोग्य सुविधा. बाळाच्या जन्मानंतर १२,००० रू. तर मुलीच्या जन्मानंतर १३,००० रू. संगोपनासाठी दिले जातात.
१७) कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेत्ररोग शिविर राबविले.
१८) आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर देत आहेत या सर्व योजना नूसत्या कागदावर नसुन अस्तीत्वात उतरवल्या आहेत. याच पार्शभुमीवर Kcr साहेबांनी TRS च नाव बदलुन अवघ्या देशाच्या सर्वागीण विकासासाठी BRS भारत राष्ट्र समिती असे ठेऊन हे गुलाबी वादळ विविध राज्यासोबत महाराष्ट्रात ही घोंघावत आहे.

अनेक दिग्गज, मा.माणिक दादा कदम भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे सह विविध शेतकरी संघटनेतील शेतकरी नेते, सामाजिक चळवळीतील कार्येकर्ते, पक्ष,संघटनेचे प्रमुख, माजी आमदार , खासदार, व इतर लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. भ्रष्टाचार रोखायचा व महागाई,बेरोजगारी,अन्याय,अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी भारताच्या,महाराष्ट्राच्या राजकारणात आता बीआरएस तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. आपल्या देशाचे,महाराष्ट्राचे व स्व:ताचे भविष्य उज्वल करण्यासाठी “अब कि बार किसान सरकार” हा केसीआर साहेबांचा नारा महाराष्ट्रातील गावागावात पोहचवून, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी या ब्रिद वाक्याला अनूसरुन “अवघे अवघे यावे ” हि विनंती.


वचिष्ट बेडके भारत राष्ट्र किसान समिती बीड 8805766674

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा