पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. अरुण राख व प्रा. आनंद घोंगडे यांची नियुक्ती




पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. अरुण राख व प्रा. आनंद घोंगडे यांची नियुक्ती

पाथर्डी
येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण राख यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर राज्यशास्त्र विषयांतर्गत कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरुण राख हे महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागात गेले वीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यांचे ‘श्रीलंकेतील वांशिक संघर्ष : भारत श्रीलंका संबंधाचा अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. संशोधन आहे तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 48 शोधनिबंधाचे लेखन त्यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये संशोधन क्षेत्रात पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच. डी. परीक्षक म्हणून कार्य केले आहे. वाणिज्य शाखेअंतर्गत बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स या विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून प्रा आनंद घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रा. आनंद घोंगडे हे महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभागात गेली वीस वर्षापासून कार्यरत आहेत तसेच त्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे लेखन करण्याबरोबरच संशोधन क्षेत्रातील मार्गदर्शक व परीक्षक म्हणून कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांची अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे दादा पाटील राजळे महाविद्यालय आदिनाथ नगर येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी मा. विक्रम राव राजळे, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी उपस्थित राहूनअभिनंदन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा