तलवार घेऊन फिरणार्‍या एकास पोलिसांनी केली अटक




तलवार घेऊन फिरणार्‍या एकास पोलिसांनी केली अटक


बीड:
हातामध्ये तलवार घेऊन फिरत असताना एका आरोपीला बीड शहर पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरील आरोपीकडून एक तलवार, जांबीया हस्तगत करण्यात आला आहे.
शेख हाफीज शेख मुजीब (वय 48 वर्षे रा. बुंदेलपुरा जुनी भाजी मंडई, बीड) हा हातामध्ये तलवार घेऊन रस्त्याने जात होता. सदरील घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर शहर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक तलवार व जांबीया जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आघाव, पवार यांनी केली असून या प्रकरणी मनोज परझणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा