दिंद्रुड पोलिस व एलसीबीची दंबग कारवाई तेलगाव येथुन चोरी गेलेली स्वीप्ट डिझायर चोरसह केली जप्त




दिंद्रुड पोलिस व एलसीबीची दंबग कारवाई
तेलगाव येथुन चोरी गेलेली स्वीप्ट डिझायर चोरसह केली जप्त
बीड
दिंद्रुड पोलीस हद्दीतील तेलगाव येथील धारूर रोड परिसरातुन चोरीला गेलेली स्वीप्ट डिझायर कार तपासाची वेगवान चक्रे फिरवत जालना येथून चोरासह एका महिन्याच्या आत एल सी बी व दिंद्रुड पोलिसांनी चोरासह जप्त केली आहे.
तेलगाव येथील शिक्षक श्रीराम अनिरुद्ध आपेट यांची स्वीप्ट डिझायर कार क्र.एम. एच.13 डी ई 4062 ही एक महिन्यांपूर्वी चोरीस गेली होती. यामुळे दिंद्रुड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते परंतु दिंद्रुड पोलीस व एलसीबी यांनी तपासाची चक्रे फिरवत एक महिन्याच्या आत सदरील गाडी व मुख्य आरोपी शेख नदीम शेख हारून यास जालना येथून पकडून गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या शेख नदीम याच्यासह औरंगाबाद येथील विशाल जाधव व)
आणखी एक आरोपी असल्याची माहिती पो ना रेवन दुधाने यांनी दिली.सदरील कारवाई दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना रेवन दुधाने,पो ना अनिल भालेराव व बीड एल सी बी चे जगताप, वाघ, गायकवाड,कदम यांच्या पथकाने केली आहे.या कार्यवाही मुळे दिंद्रुड पोलीस व बीड एल सी बी चे परिसरातून कौतुक होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा