दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतदेह




पोलीस ठाणे दिंद्रुड तर्फे आवाहन

दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत बीड परळी हायवेवर तेलगाव येथील शितल बारच्या बाजूला अनोळखी व्यक्तीचे मृत अवस्थेतील प्रेत दिनांक 12 रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान सापडले असून त्याचे वय अंदाजे 38 वर्ष आहे.त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याची प्राथमिक माहिती समजली आहे,त्याच्या अंगामध्ये पिवळ्या रंगाचा बदामी कलरचा शर्ट ,असून तपकिरी फिकट रंगाची पॅन्ट आहे,त्याच्या कमरेला लाल करदोरा असून त्याला काळ्या रंगाची पेटी बांधलेली आहे.,सदर मृत इसमाची बरीच चौकशी केली परंतु अद्याप पर्यंत त्याचे नाव व गाव माहित झाले नसून सदर अनोळखी इसमाचे प्रेत अंबाजोगाई शीतगृहामध्ये ठेवण्यात आले आहे.

तरी कोणास काही माहिती असल्यास
सपोनि अण्णाराव खोडेवाड व तेलगाव बीट अंमलदार बालाजी सूरेवाड यांच्याशी

7507121289,
9552529115 या नंबर वर संपर्क साधा.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा