शिवसेना जिल्हाप्रमुखपदी‌ परमेश्वर सातपुते यांची‌ निवड करण्याची शिवसैनिकांची मागणी




ग्रामीण भागातील समस्यांची‌ जाण‌, स्वच्छ प्रतिमा, सक्षम नेतृत्वगुण, यामुळे परमेश्वर सातपुते हेच‌ जिल्हाप्रमुख पदासाठी योग्य व्यक्तिमत्त्व आहे.
बीड
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे‌ माजलगाव-परळी-केज-अंबेजोगाई‌ या विभागाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पक्षाने त्यांना बाहेरचा‌ रस्ता दाखवल्याने‌ या‌ विभागाचे‌ जिल्हाप्रमुखपद‌ हे रिक्त झाले असून या जिल्हाप्रमुख पदासाठी ग्रामीण भागातील समस्यांची‌ जाण‌ असणारे स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक चारित्र्य असलेले मा‌‌.परमेश्वर‌ सातपुते यांची‌ निवड करावी अशी मागणी या विभागातील शिवसैनिक, शेतकरी व सर्व सामान्य बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. परमेश्वर सातपुते यांच्या आजवरच्या कामगिरीचा‌ आढावा घेतला असता कसलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना पिंपळनेर विभागातील बाबळवाडी‌ गावातून निर्माण झालेले उमदा‌ नेतृत्व म्हणून त्यांची‌ ओळख निर्माण झाली आहे. बाबळवाडीचे आदर्श सरपंच, शिवसेनेच्या किसान सेनेचे जिल्हाप्रमुखपद‌ भुषविताना‌ त्यांनी शेतकरी बांधवांचे असंख्य प्रश्न सोडविले‌ आहेत यात कापसाला‌ भाव मिळावा यासाठी केलेले‌ आंदोलन, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या शेतकरी बांधवांना शासकीय आर्थिक मदत मिळवून देणे‌,पिक‌ विमा मिळवून देणे,ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी, प्रश्न सोडविण्यासाठी परमेश्वर सातपुते यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. गोरगरीबांना‌ शासनाच्या विविध योजनांचा‌ लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरतपणे मेहनत घेतली आहे. गोरगरीब महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविले आहेत आपल्या जगदंबा क्रेडिट ऑफ सोसायटी बँकेच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. जगदंबा पेट्रोल पंप ,जगदंबा कंट्रक्शनच्या माध्यमातून गोरगरीब युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. पिंपळनेर-बेलवाडी-बाबळवाडी-बेडुकवाडी सेवा सोसायटीच्या माध्यमातून या विभागातील अनेकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे.बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर असताना असंख्य शेतकरी बांधवांचे प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. बाबळवाडीचे सरपंचपद दहा वर्षे भुषविताना‌ या गावाचा‌ विकासकामांच्या‌ माध्यमातून कायापालट केला आहे.
शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमात‌, आंदोलनात त्यांचा‌ हिरीरीने सहभाग असतो. त्यामुळे निष्कलंक चारित्र्य युवा नेतृत्व असणारे शिवसेना नेते मा‌.परमेश्वर सातपुते हेच‌ माजलगाव-परळी‌-केज-अंबेजोगाई‌ या विभागाचे जिल्हाप्रमुख होण्यासाठी योग्य आणि सक्षम उमेदवार आहेत.
तसे पाहता माजलगाव-परळी-केज-अंबेजोगाई‌ विभागात शिवसेना प्रमुख स्व‌. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना मानणारा खूप मोठा चाहता वर्ग आहे. शिवसेना पक्षावरील निष्ठा असणारे असंख्य शिवसैनिक आहेत मात्र जिल्हाप्रमुख म्हणून सक्षम नेतृत्व न मिळाल्याने यांचे‌ व सर्व सामन्यांचे प्रश्न अनुत्तरितच‌ राहिले आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनाचा‌ मोठा‌ मतदार आहे त्यामुळे येथे शिवसेनाचा आमदार निवडून येऊ शकतो त्यासाठी योग्य नेतृत्व जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा‌ समन्वय राखणे, मतदार संघातील लोकप्रश्न‌ सोडविल्यास‌ येथे शिवसेनेचा‌ भगवा फडकवू‌ शकतो. परळी मतदार संघात देखील शिवसेनेची‌ ताकद पाहण्यास मिळेल फक्त निष्ठावंत जिल्हाप्रमुख असणे आवश्यक आहे. केज-अंबेजोगाई‌ मतदार संघात देखील शिवसेनेचा‌ महिला उमेदवार निवडून येऊ शकतो गरज आहे चांगले लोकनेतृत्व असणारे जिल्हाप्रमुख निवडणे‌ हे सर्व गुण परमेश्वर सातपुते यांच्या मध्ये आहेत त्यामुळे या विभागात शिवसेनेची उभारणी, शिवसेना पक्षाची ताकद वाढविण्यासाठी,या विभागात विधानसभेवर‌ भगवा फडकविण्यासाठी मा‌. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी निष्ठावंत व चारित्र्यसंपन्न असणारे परमेश्वर सातपुते यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी‌ निवड करावी अशी मागणी या विभागातील शिवसैनिक व सर्वसामान्यांतून‌ होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा