नौकरीच्या नावाखाली तरुणाला तीन लाखाला चुना !




‘पार्टटाइम नोकरीला इच्छुक आहात का?’  टास्क फ्रॉडमध्ये तरुणाला ३ लाखांचा गंडा

पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली आहे.

याबाबत शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली.

पुणे

शरद किसान दाभाडे (वय २२, रा. शास्त्रीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणाला अनोळखी क्रमांकावरून ‘पार्टटाइम नोकरी करण्यास इच्छुक आहात का?’ असा मेसेज आला. तरुणाने होकार दिला असता वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम ग्रुपमध्ये सामावून घेतले. त्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणाकडून तब्बल ३ लाख १ हजार रुपये उकळले. काही कालावधीनंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने तरुणाने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा