चोरीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई




चोरीच्या गुन्ह्यातील
दोन फरार आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
। बीड
दि.26 ः नेकनूर, केज येथील चोरीच्या गुन्ह्यातील  फरार असलेले दोन आरोपी मंगळवारी (दि.25) दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने जेरबंद केले. पुढील तपास कामी संबंधित पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
सोन्या उर्फ सोमनाथ सुंदर पवार हा नेकनूर ठाणे हद्दीतील वडवाडी येथील दरोड्यातील आरोपी होता, तो घोळवे पिंपळगाव येथे असल्याची माहिती मिळताच त्यास जेरबंद केले. तो दरोडा व घरफोडीच्या तीन व चोरीच्या एका गुन्ह्यात फरार होता. दादा चंद्रकांत पवार (रा.रामेश्वरवाडी ता.केज) हा मस्साजोग येथे महामार्गावर जॅक टाकून ट्रकवर शस्त्रासह दरोडा टाकणार्‍या गुन्ह्यात फरार होता. त्यास नांदूरघाट येथून ताब्यात घेतले. दोघांना संबंधित पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राजु पठाण, देविदास जमदाडे, युनूस बागवान, गणेश हांगे यांनी केली.
—————-

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा