बीडमध्ये उध्दव प्रभुजी भक्तीशास्त्रींच्या भागवत कथेचे आयोजन




कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा – नवनाथ शिराळे

 बीड

येत्या २ ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान बीडमध्ये उध्दव प्रभुजी भक्तीशास्त्री महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन केले आहे, या भागवत कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सोमेश्वर मंदिराचे अध्यक्ष नवनाथ शिराळे पाटील यांनी केले आहे.

पुरूषोत्तम अधिक मास व श्रावण मास या पावण पर्वानिमित्ताने या संगितमय श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन केले आहे. दुपारी तीन ते सहा यावेळेत ही भागवत कथा शहरातील सोमेश्वर मंदिर या ठिकाणी होणार आहे. सोमेश्वर मंदिराचे अध्यक्ष नवनाथ शिराळे यांनी पुढाकार घेवून ही कथा आयोजित केली आहे. दरम्यान या भागवत कथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवनाथ शिराळे यांच्यासह पांडूरंग जानवळे, अँड गोविंद नवनाथ शिराळे, सदाभाऊ शेजाळ, कृष्णा शिराळे, नागोराव काकडे, बलराम शिराळे, मुरलीधर दुधाळ, दिपक कदम, बंडू धांडे, हजारे मामा, अक्षय शिराळे, गणेश शिराळे, प्रधान पवार, प्रदिप बाब्रस यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा