लिंबागणेश येथे दिवसाच कमलबाई खिल्लारे यांच्या घरी चोरी




 

रविवार दि.३० जुलै रविवार रोजी सकाळी रानात कामासाठी गेलेल्या श्रीमती कमलबाई भगवान खिल्लारे वय ६० वर्षे आपल्या नातीसह पल्लवी वय १४ वर्षे दररोज प्रमाणे स्वतः:च्या शेतात कामासाठी गेले होते.सायंकाळी ५ वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. भाचा दिनेश वायभट यांना कळवले असता त्यांनी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.हे. राऊत संतोष यांना फोनवरून चोरीच्या घटनेची कल्पना दिली असता.पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील व पो.हे.संतोष राऊत घटनास्थळी दाखल झाले. श्रीमती कमलबाई खिल्लारे यांच्या म्हणण्यानुसार काही रोख रक्कम व सोनं चोरीला गेल्याचे सांगितले.पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.
महिनाभरापासुन डोळ्याच्या आपरेशन मुळे घरीच असणा-या कमलबाई आजच शेतात कामासाठी गेल्या होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा