जैन भवन येथे आज सायबर क्राइम आणि सुरक्षितता मूलमंत्र कार्यशाळेचे आयोजन




जैन भवन येथे आज सायबर क्राइम आणि सुरक्षितता मूलमंत्र कार्यशाळेचे आयोज

बीड

पुण्यातील सायबर क्राइममध्ये जिंकण्याच्या ताकदीने प्रसिद्ध झालेल्या संदीप गदिया यांचे सायबर क्राइम आणि सुरक्षितता वोर्कशॉप बीडमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमास बीड जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर हेही उपस्थित राहणार आहेत. या वर्कशॉपमध्ये महिला, युवक, युवती, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी सायबर सुरक्षिततेच्या उपाययोजना दृकश्राव्य माध्यमातून स्पष्ट करण्यात येतील.
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनसह अनेक पदव्या संपादन केलेले गादिया हे प्रमाणित नैतिक हॅकर आहेत. संगणक हॅकिंग, फॉरेन्सिक अन्वेषक, प्रमाणित डेटा पुनरप्राप्ती तज्ञ असून या क्षेत्रातील अठरा वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 52000 हुन अधिक पोलीस, 100 न्यायपालिका विविध राज्यातील 14000 हुन अधिक केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी त्याच बरोबर 8000 हुन अधिक भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि नौदलाचे अधिकारी यांना प्रशिक्षण दिले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गदिया यांना सायबर क्राइम लॅब, USA यांनी लेथर फॉरीस्टकेटर या सन्मानाने पुरस्कृत केले आहे.
सायबर क्राइम धोके आणि त्यापासूनच्या सुरक्षितता याचे ज्ञान सर्वांना अवगत व्हावे या सामाजिक जाणिवेतून येथील श्री जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळ व श्री जैन स्थानकवासी जैन श्रावक संघाने या कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन आज रविवार दि.6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत जैन भवन, सुभाष रोड, बीड येथे केले आहे.
चातुर्मासानिमित्त विराजित साध्वी महासती श्री कमलावतीजी म.सा. प्रज्ञामुर्ती साध्वी डॉ.अक्षयज्योतीजी मा.सा. आदी ठाणा 5 यांच्या सानिध्यात संपन्न होणार्‍या या कार्यशाळेचा शहरातील सुज्ञ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने  समाजभूषण नितिनचंद्र कोटेचा यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा