सोन्नाथडी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप




माजलगाव
तालुक्यातील सोन्नाथडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत युवा सेनेचे माजलगाव विधानसभा प्रमुख रोहित वगरे यांच्या वाढदिवसानिमीत्त हनुमान काटकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दि. 7 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी माजी पंचायत समिती सदस्य केरबा पराड हे तर मल्हार सेना तालुकाप्रमुख विलास नेमाणे, हनुमान काटकर, अनिल कावळे, विष्णु व्हरकटे, शंकर शिंदे, डिगांबर देवकते, दत्तात्रय व्हरकटे, रमेश देवगुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोन्नाथडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 80 मुला – मुलींना पेन, वहि, कंपोसबॉक्स, रंगपेटी असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय पारडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष गांजुरे यांनी तर आभार कैलास साखरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा