गोरगरिबांचे‌ आधार शिवसेना युवा नेते परमेश्वर सातपुते




 

शेतकरी बांधवांचे‌ कैवारी सर्वसामान्यांना अहोरात्र मदत करणारे‌ सुकानुधारी‌ लोकनेतृत्व परमेश्वर सातपुते सर‌ वाढदिवस विशेष लेख

बीड जिल्हा हा युवा नेत्यांची खाणच‌‌ आहे. अनेक युवा नेत्यांनी आपल्या समाजकार्यातून‌ प्रतिभा निर्माण केली आहे. त्यातीलच‌ एक म्हणजे कसलाही राजकीय वारसा‌ नसताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले सर्वसामान्य व‌ शेतकरी बांधवांना अहोरात्र मदत करणारे‌ लोकनायक परमेश्वर सातपुते होय‌…
“कुळी‌ कन्या पुत्र होतीजे‌ सात्विक तयाचा‌ हरिख‌ वाटे‌ देवा‌” या‌ संत‌ तुकाराम महाराज यांच्या‌ अभंगातील भावाप्रमाणे किर्तीमान‌ असणाऱ्या या अनमोल रत्नाचा‌ जन्म बीड तालुक्यातील पिंपळनेर सर्कल मधील ‌ बाभळवाडी या गावी दि‌.७ ऑगस्ट १९८४ रोजी झाला. लहानपणापासूनच‌ कुशाग्र बुध्दी असल्याने त्यांनी शालेय अध्यापनात नावलौकिक मिळवले‌. महाविद्यालयात‌ असताना‌ त्यांनी‌ विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर‌ आवाज‌ उठवून त्यांना न्याय मिळवून दिला. एम‌. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ रिलायन्स इन्शुरन्स कंपनीत‌ मॅनेजरची‌ नोकरी ही‌ केली ; मात्र त्यांचे या नोकरीत मन‌ न रमल्याने‌ त्यांनी या पदाचा‌ राजीनामा दिला. परमेश्वर सातपुते यांनी जि‌.प. वस्तीशाळा शिक्षक म्हणूनही काम केले त्यामुळे लोक त्यांना आदराने सर‌ म्हणून लागले. समाजसेवा करण्याची ओढ‌ असल्याने त्यांनी ही नोकरी ही‌ सोडली‌. बाभळवाडी हे गाव शिवसेनेचा‌ बालेकिल्ला असल्याने लहानपणापासूनच परमेश्वर सातपुते सरांना शिवसेनेचे बाळकडू मिळाले शिवसेनेचा‌ भगवा खांद्यावर घेत त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख ते‌ पुढे शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख पदी मजल मारली. हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व‌. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी‌ प्रेरित होऊन त्यांनी‌ समाज सेवा करण्याचा‌ निर्णय घेतला यासाठी‌ शिवसेनेत‌ प्रवेश घेऊन ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही‌ स्व‌. बाळासाहेब ठाकरे यांची‌ शिकवण तंतोतंत जोपासली.

ग्रामीण भागात पायाला‌ भिंगरी‌ लागल्या प्रमाणे फिरून शेतकरी, कामगार, बेरोजगारांच्या समस्या जाणून घेतल्या व शासन‌ दरबारी आवाज‌ उठवून त्या‌ सोडविल्या‌ याचे‌ फळ म्हणजे सन‌ २००७ च्या‌ बाभळवाडी या गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीत युवा नेते परमेश्वर सातपुते प्रचंड मतांनी विजयी झाले. सरपंचदाच्या‌ काळात त्यांनी बाभळवाडी या गावाचा‌ कायापालट करीत रस्ते‌, वीज, पाणी प्रश्न सोडवित‌ गावात विकासगंगा‌ आणली‌ याची‌ पोहच‌ पावती म्हणून पुन्हा सन‌ २०१३ या‌ वर्षी त्यांची‌ पुन्हा सरपंचपदी लोकनियुक्ती‌ झाली.बाभळवाडी पाणंद मुक्त केल्याने त्यांच्या गावास‌ पाणंद मुक्त गाव‌ हा पुरस्कार मिळाला.

आपल्या सरपंच पदाच्या काळात गावात भांडणे‌ न होऊन देता‌ सलोख्याचे वातावरण निर्माण केल्याने त्यांच्या बाभळवाडी गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार देखील मिळाला‌.आपल्या गावातील समस्या जाणत‌ असताना ते‌ स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकरी बांधवांच्या समस्यांची‌ पुर्णता‌ जाणिव‌ असल्याने त्यांनी शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसैनिकांना संघटीत करून लोकशाही मार्गाने आंदोलन केले. यामुळे शेतकरी बांधवांच्या समस्यांचा‌ निपटारा तात्काळ होऊ‌ लागला‌ परमेश्वर सातपुते यांच्या शेतकरी आंदोलनाची‌ दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची सन‌ २०१७ या वर्षी शिवसेनेच्या किसान सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी‌ निवड केली. आपल्या खांद्यावर हे‌ पद‌ आल्यावर त्यांनी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना लोकशाही मार्गाने आंदोलन करून वाच्या‌ फोडण्याचे‌ काम केले. यामध्ये शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमुक्ती‌ मिळावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला‌ शासना‌तर्फे आर्थिक मदत मिळावी, कापसाला‌ चांगला‌ भाव मिळावा, शेतकरी बांधवाचा‌ ऊस गाळप होऊन त्यास चांगला भाव मिळावा, शेतकरी बांधवांच्या भाजीपाला व फळांना चांगला भाव मिळावा म्हणून आंदोलन केले. तसे‌ पाहता‌ बीड जिल्हात‌ कधी ओल्या तर‌ कधी कोरड्या दुष्काळाने थैमान घातले आहे.

कोरड्या दुष्काळाच्या काळात परमेश्वर सातपुते यांनी पिंपळनेर परिसरात चारा छावणी उभारून मुक्या‌ जनावरांचा‌ जीव‌ वाचवून‌ त्यांच्या चारापाण्याची‌ व्यवस्था करून शेतकऱ्यांना आधार देऊन आपले सुकाणुधारी‌ नेतृत्व सिद्ध केले. अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे उभे‌ पिक‌ पाण्यात वाहून गेले यामुळे शेतकरी बांधवांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी म्हणून त्यांनी आंदोलन केले. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान मिळण्यासाठी, पीक कर्ज, पीक‌ विमा‌ मिळवण्यासाठी शासन‌ दरबारी मागणी करून त्यांनी शेतकरी बांधवांना तत्परतेने मदत केली. त्यामुळे परमेश्वर सातपुते हे शेतकरी बांधवांचे‌ कैवारी आहेत हे सिद्ध होते . शिवसेना युवा नेते परमेश्वर सातपुते यांनी २०१७ साली शिवसेनेच्या तिकिटावर धनुष्य बाण चिन्ह घेऊन पिंपळनेर जि.प.गटातून निवडणूक लढवली त्यावेळी अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला;परंतु लोकांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे लोकांच्या मनातील जि.प.सदस्य म्हणून लोक त्यांना बघतात.
बेरोजगार युवकांना हाताला काम मिळावे हा‌ पवित्र विचार मनात घेऊन त्यांनी जगदंबा कंट्रक्शनच्या माध्यमातून बेरोजगारांना काम मिळवून दिले‌. तसेच बाभळवाडी परिसरात पेट्रोल पंप सुरू करून यात अनेक युवकांना काम‌ देऊन त्यांना आर्थिक आधार दिला. तसेच जगदंबा अर्बन बँकेची‌ स्थापन करून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना यात संधी देत‌ त्यांचे‌ दातृत्व स्विकारले. पिंपळनेर, बाभळवाडी,बेडुकवाडी‌, बेलवाडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी असताना त्यांनी शेतकरी बांधवांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना आधार दिला. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी असताना त्यांनी कापूस खरेदी पारदर्शक पद्धतीने करून शेतकरी बांधवांच्या कापूस,तूर‌ , सोयाबीन या‌ नगदी पिकांना चांगला‌ भाव मिळवून दिला‌. आपल्या पिंपळनेर-बाभळवाडी‌ रस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत ६ कोटी मंजूर करून त्यांचा‌ दळणवळणाचा‌ प्रश्न सोडविला‌.परमेश्वर‌ सातपुते यांनी
शिवसेना पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीत इमानेइतबारे काम करीत शिवसेनेला‌ उभारी‌ मिळवून दिली. गाव‌ तिथे‌ शाखा ,घर‌ तिथे शिवसैनिक निर्माण केला‌.त्यामुळे परमेश्वर सातपुते हे‌ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचे‌ विश्वासपात्र कट्टर शिवसैनिक म्हणून सुपरिचित आहेत. परमेश्वर सातपुते यांच्या अंगी‌
उत्कृष्ट संघटना कौशल्य,व उत्कृष्ट वक्तृत्व असल्याने सभा गाजवण्यासाठी वक्ते म्हणून ही त्यांचा‌ नावलौकिक आहे.कला शाखेमध्ये शिक्षण घेतले आसल्याने मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आसलेले नेतृत्व म्हणून त्यांचे‌ नाव जनमाणसात‌ गाजले‌‌ आहे.


शेतकरी कष्टकरी यांची जाण असलेले ग्रामीण भागातील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख झाली.
नुकतीच त्यांनी बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या माजलगाव -परळी-केज-अंबेजोगाई विभागाच्या पदासाठी मुलाखत दिली असून येणाऱ्या काळात त्यांची‌ या विभागात शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी निवड होईल असा‌ विश्वास शिवसैनिक व सर्वसामान्यांना आहे ‌.
शिवसेनेचे‌ किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर‌ हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत त्यांचे‌ सर्व पक्षातील‌ पदाधिकाऱ्यांशी‌ सौजन्याचे‌ संबंध आहेत. स्वच्छ व निष्कलंक चारित्र्य असल्याने त्यांची‌ जनमानसात प्रगल्भ प्रतिभा‌ आहे.शिवसैनिकांच्या‌ अडीअडचणीला‌ मदत करून‌ त्यांनी त्यांना‌ आधार दिल्याने त्यांचे‌ शिवसैनिकात‌ आदराचे‌ स्थान आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र उपलब्ध असणारे‌ परमेश्वर सातपुते सर‌ यांनी अनेक अपघातग्रस्त रूग्णांना मदत करीत त्यांना दवाखान्यात उपचार उपलब्ध करून त्यांचा‌ जीव वाचवला‌ आहे. अनेक गंभीर रूग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे. कोराना‌ काळात त्यांनी कोराना‌ रूग्णांना तात्काळ उपचार मिळवून देत‌ त्यांचे‌ प्राण‌ वाचविले आहेत. त्यामुळे ते‌ सर्व सामान्यांसाठी देवदुतच‌ आहेत.
असे हे शेतकरी बांधवांचे‌ कैवारी, समाजसेवक‌ , कट्टर शिवसैनिक असणारे‌ परमेश्वर सातपुते सर‌ यांचा‌ आज दि‌.७ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे ‌.
परमेश्वर सातपुते यांना दीर्घायुष्य,यश, किर्ती, आरोग्य, धनसंपदा लाभो व त्यांच्या हातून शेतकरी बांधवांचे व सर्व सामान्यांचे‌ प्रश्न असेच‌ सुटत‌ राहो त्यांच्या हातून अखंड समाजसेवा घडत‌ राहो‌ हीच मागणी मी ईश्वर चरणी करतो….
किसान सेनेचे जिल्हाप्रमुख शिवसेना युवा नेते परमेश्वर सातपुते सर‌ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!

संपादक – दत्तात्रेय नरनाळे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा