सुदामा-श्रीकृष्णाच्या अनोख्या भेट दर्शनाने संगीतमय भागवत कथेचा महाप्रसादाने समारोप




 

दुःखहर्ता आणि सुखकर्ता कृष्ण भगवंतच – उद्धव प्रभुजी शास्त्री

नवनाथ अण्णा शिराळेनी भागवत कथेच्या आयोजनातून भक्तांना परमार्थाचा मार्ग दाखवला – राजेंद्र मस्के


बीड

आपल्या जीवनातील दुःखांचे हरण करणारा दुःखहर्ता आणि सुख देणारा सुखकर्ता खरा भगवंत हरीचा श्रीकृष्णच आहे. त्यामुळे भागवताचे आचरण करा. तुमचे आयुष्य सुखमय होईल. तुमच्यापासून चिंता दुःख कोसो दूर जाईल. असे संगीतमय भागवत कथेच्या समारोपप्रसंगी भागवताचार्य उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून विचार व्यक्त केले.
बीड येथील बिंदुसरा नदीच्या तीरावर जाज्वल्य श्री सोमेश्वराच्या मंदिर परिसरात भाजप नेते नवनाथ अण्णा शिराळे यांच्या आयोजनातून संगीतमय भागवत कथेचा समारोप मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता महाप्रसादाने झाला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांचा श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने यथोचित सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्यासह अँड गोविंद शिराळे, कृष्णा शिराळे, बलराम शिराळे, माजी नगरसेवक बाबुराव परळकर, माजी नगरसेवक दत्ताभाऊ थिगळे यांनी केला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले भाजपा नेते नवनाथ अण्णा शिराळे यांनी जाज्वल्य मंदिर असलेल्या सोमेश्वर मंदिराचा खऱ्या अर्थाने उद्धार केला आहे. या मंदिरामध्ये देवपण होतंच पण त्या देवपनामध्ये देवत्व निर्माण करण्याचे काम त्यांच्या निष्काम, निस्वार्थ सेवेतून घडले आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांचे अथक प्रयत्न आदर्शवत आहेत. भागवत कथेचे आयोजन अधिक मास आणि पावन श्रावण मासाच्या प्रसंगात आयोजन करून त्यांनी भक्तांना खऱ्या अर्थाने परमार्थाचा मार्ग दाखवला आहे. मी देखील महाराजांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथेचे श्रवण करण्यासाठी या ठिकाणी दोन वेळा आलो होतो. या यशस्वी आयोजनाबद्दल मी शिराळे परिवाराचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील निस्वार्थ कार्याला शुभेच्छा देतो, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी उद्धव प्रभूजी महाराज यांचा यथोचित सत्कार करून शुभाशीर्वाद घेतले.
पुढे बोलताना उद्धव प्रभुजी शास्त्री म्हणाले, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दुःखाने ग्रासलेले आहे. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी भागवत कथेचे केवळ श्रवण करून चालणार नाही तर भागवत कथा आपल्या आयुष्याच्या वाटचालीत प्रत्यक्षात आचरणात आणणे गरजेचे आहे. भागवत कथेमध्ये आपल्यातील दुर्गुण, वासना, स्वार्थ यांचा विनाश करण्याचे सामर्थ्य आहे. भगवंत श्रीकृष्ण आणि सुदामा यांची प्रत्यक्ष भेट कशी झाली आणि या भेटीनंतर सुदामपुरीचे द्वारकापुरीत कसे रूपांतर झाले हे आपल्या संगीतमय कथेतून उद्धव प्रभुजींनी आपल्या रसाळ वाणीतून वास्तवात प्रसंग उभे करून कथेचा समारोप केला. यावेळी प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण, रुक्मिणी, सुदामा यांच्या पात्रातून सुदामा आणि भगवंत श्रीकृष्णाच्या भेटीचे अनोखे दर्शन भगवंतांना घडवून आणले. संगीतमय भागवत कथेच्या समारंभास हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेच्या समारोपानंतर यादवेंद्रजी प्रभुजी शास्त्री,भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाजपा नेते नवनाथ अण्णा शिराळे, सौ रुक्मिणीबाई नवनाथ शिराळे, अँड गोविंद नवनाथ शिराळे, कृष्णा शिराळे, बलराम शिराळे, सोनम शिराळे, श्रावणी शिराळे, गोरख आबा शिराळे, प्रा. रामनाथ डाके, पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी, माजी नगरसेवक बाबुराव परळकर, माजी नगरसेवक दत्ताभाऊ थिगळे, शिवसेनेच्या अलकाताई डावकर, भाजपाच्या लताताई मस्के त्याचबरोबर प्रा. जाधव सर,ज्ञानदेव डाके, पांडुरंग जानवळे मामा, प्रधान पवार, श्रीहरी वाघमारे, रमेश वाघमारे, मुरलीधर दुधाळ या मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरतीने कथेचा समारोप झाला या भागवत कथेच्या यशस्वीतेसाठी दीपक शेरकर मंडपवाले, हनुमान गायकवाड वाचमन यांचीही अनमोल साथ मिळाली. यानंतर महाप्रसादाने संगीतमय भागवत कथेचा समारोप झाला.

उद्धव प्रभुजींचे 79 वे भागवत कथन
वृंदावन येथील भागवताचार्य उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी बीड येथील श्री सोमेश्वर मंदिरात आपल्या अमृततुल्यवानीतून 79 वे भागवत कथेचे प्रवचन केले. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी भागवत कथेला प्रारंभ केलेला आहे.उद्या खानदेशातील जळगाव येथे त्यांचे 80 वावी भागवत कथा होणार आहे. त्यांच्या समावेत या भागवत कथेला गीतकार आणि संगीतकार म्हणून अनमोल साथ लाभली ती भूषण कोरडे यांची. त्यांच्या साथीला भूषण पोहरकर, तबलावादक मयूर, अक्षय शिंदे यांनी अप्रतिम साथ दिली. त्याचबरोबर यादवेंद्रजी प्रभुजी यांनी हे अथक परिश्रम घेतले. या सर्व श्रीकृष्ण भक्तांचे ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

यापुढे सलग तीन वर्ष उद्धव प्रभूजींची भागवत कथा – नवनाथ अण्णा शिराळे
जाज्वल्य मंदिर असलेल्या श्री सोमेश्वर मंदिराच्या उद्धारासाठी मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांची अमूल्य साथ मिळाली. भाविक भक्तांनी आपल्या परीने दिलेले अनमोल योगदान यामुळेच या मंदिराचा कायापालट होऊ शकला. या सर्व भक्तांचे मी ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आणि भाविक भक्तांच्या भक्तीमय वातावरणासाठी या मंदिरात सातत्याने धार्मिक कार्य पार पाडले जातात. विविध देवदेवतांच्या कार्यक्रमासह या ठिकाणी विविध सप्ताहांचे देखील आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व भक्तांचे आभार व्यक्त करून नवनाथ अण्णा शिराळे यांनी यापुढे सलग तीन वर्ष वृंदावन येथील उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांच्या अमृततुल्य वाणीतून याच ठिकाणी भागवत कथा होईल असे जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थित भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा