अखेर त्या पाण्यात बुडालेल्या भाविकाचा ३५ तासांनंतर




 

पुरूषोत्तमपुरीत पाण्यात बुडालेल्या भाविकाचा ३५ तासांनंतर अखेर मुत्यदेह सापडला

एन.डी.आर.एफ जवानांच्या तुकडीचे दुसऱ्या दिवशी यश

घटनास्थळी,परतुर माजलगावचे महसूल अधिकारी व पोलीस तळ ठोकुन होते

माजलगाव ( ज्योतीराम पाढंरपोटे ) तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सध्या अधिक मास असल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून भरातून भावीक भक्त येतात. पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदी वाहते या नदीमध्ये आंघोळ करून भाविक भक्त दर्शन घेतात,दि ११ ऑगस्ट रोजी आंघोळ करत असताना जालना जिल्ह्यातील भावीक गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला होता, दुसऱ्या दिवशी अखेर ३५ तासा नंतर सदरील भाविकाचा मुत्यदेह एन.डी.आर.एफ च्या पथकाला शोध कार्य दरम्यान सापडला आहे.दरम्यान घटनास्थळी जालना जिल्ह्यातील परतुर व माजलगाव तहसीलचे महसूल अधिकारी व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तळ ठोकुन होते.

दि ११ ऑगस्ट रोजी पुरुषोत्तमपुरीच्या गोदावरी नदीपात्रात मारुती खवले वय ४५ वर्षं राहणार पाटोदा तालुका परतुर जिल्हा जालना हे आपल्या नातेवाईका सोबत पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आले होते ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे ही,घटना दि ११ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे बुडालेल्या व्यक्तीचा स्थानिकांनी शोध घेतला परंतु दि १२ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास घटना घडल्यापासून ३५ तासा नंतर सदरील भाविकाचा गोदावरी नदीपात्रात बुडालेला मुत्यदेह जालना जिल्ह्यातील एन.डी.आर.एफ तुकडीच्या बचाव पथकाला शोधकार्या दरम्यान सापडला आहे.दरम्यान घटनास्थळी जालना जिल्ह्यातील परतुर व माजलगाव तहसीलचे महसूल अधिकारी व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तळ ठोकुन होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा