प्रमाणिक प्रयत्न करणार्‍यांना काँग्रेसमध्ये मोठी संधी-आमदार अमित देशमुख




येणार्‍या प्रत्येक निवडणूका काँग्रेस ताकतीने लढवणार- अशोक पाटिल
राहुल गांधीच्या भारत जोडो यांत्रेने बीड जिल्ह्याला जनाधार मिळाला- जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख
 काँग्रेस पक्ष फाईवस्टार प्रमाणे आहे परंतु नो व्हाकांसी बोर्ड काढून कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे – राहुल सोनवणे
बीड
काँग्रेस पक्ष हा एकसंघ आहे. प्रमाणीक काम करणार्‍यांना मोठी संधी मिळते. कार्यकर्त्यांनो काम करा येणारा काळ आपलाच असेल, बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे जे करता येईल ते प्रमाणीक पणे केले जाईल. असे माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले. तर काँग्रेसला बीडमध्ये पुर्वीपासूनच जनाधार आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची मोठी ताकत असून आगामी निवडणूकाही काँग्रेस पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे माजी मंत्री अशोकराव पाटील म्हणाले. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख बोलतांना म्हणाले की, आमचे नेते राहुलजी गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे देशात काँग्रेसला जनाधार मिळाला असून बीडमध्येही काँग्रेस पक्षात नवचैतन्य निमर्ण  झाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा आम्ही लढवू आणि जिंकुही असेही राजेसाहेब देशमुख म्हणाले,  जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा फाईव्ह स्टार हॉटेल प्रमाणे आहे परंतून बीड जिल्हा काँग्रेसमध्ये आतापर्यंत नो व्हॅकॅन्सी बोर्ड लागला होता. परंतू आता. आमच्या नेत्या खा. रजनीताई पाटील व अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यामध्ये अनेक ताकतीचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्यासाठी तयार असून कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असे सोनवणे म्हणाले बीडमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. 13 ऑगष्ट रोजी कार्यकर्ते पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली योवळी ते बोलत होते.
बीड जिल्हा लोकसभा प्रभारी म्हणून आ. अमित देशमुख यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नानसाहेब पटोल यांनी केली. त्यानंतर आ. अमित देशमुख यांनी प्रथमच बीड शहरात जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ते पदाधिकार्‍यांची बैठक झाल्यानंतर अमित देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार असावा अशी मागणी सर्व कार्यकर्त्यातून होत आहे. आम्ही तशी तयारीही केली आहे. लोकसभेसह विधानसभेच्या सहा जागांसाठी आमच्याकडे इच्छूक उमेदवार आहेत. त्यांची नावे ही आलेली आहेत. आणखी काही नावे येत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. मात्र सध्याचे राजकारण महाराष्ट्राला शोभा देत नाही. काँग्रेस पक्षाची एक शिस्त आहे एका चौकटीत राहून आम्ही काम करतो. काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, कामाला लागा. येणारा काळ आपलाच असेल.  बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी जे काही करता येईल ते मी प्रमाणीक पणे करणार आहे असेही ते म्हणाले.   यावेळी बोलतांना माजी मंत्री अशोक पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यात काँग्रेसला माणनारा मोठा वर्ग आहे. भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार असतांना मी लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा याच बीड जिल्ह्यातील मतदार बंधूनी मला निवडूण दिले होते. परंतून प्रशासनाच्या चूकीमुळे माझा पराभव झाला. आजही काँग्रसला मानणारा मोठा वर्ग येथे आहे. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस कधी विचारात घेत नव्हते. निवडणुका आल्या तरच त्यांना काँग्रेसची आठवण येत होती. मात्र आता काँग्रेस एक संघ आणि मजबूत आहे. गावागावात गेल्यावर काँग्रेस पक्षाचे मोठे कार्यकर्ते जमा होतात. आम्ही प्रत्येक गावात बूथ बांधणी पासून कार्यकर्ते तयार केले आहेत. आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील काँग्रेसला जनचैतन्य  मिळाले आहे. बीडमध्येही त्याचामोठा फायदा झाला असून पुन्हा एकदा काँग्रेस उभारी घेत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा भक्कम आहे आम्हाला लोकसभेसह विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा हव्यात. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे संधी मिळाली तरच आमची ताकद कळेल आणि आणि पक्ष मोठा होईल असेही देशमुख म्हणाले. तर जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा फाईव्ह स्टार हॉटेल प्रमाणे आहे परंतून बीड जिल्हा काँग्रेसमध्ये आतापर्यंत नो व्हॅकॅन्सी बोर्ड लागला होता. परंतू आता. आमच्या नेत्या खा. रजनीताई पाटील व अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यामध्ये अनेक ताकतीचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्यासाठी तयार असून कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले. या बैठकीचे प्रस्ताविक दत्ता कांबळे दत्ता कांबळे तर आभार प्रदर्शन गणेश बजगुडे यांनी केले
या बैठकीला बीड जिल्हा लोकसभा प्रभारी माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी मंत्री अशोकराव पाटील, बीड जिल्हा सहप्रभारी देविदास भन्साळी, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, माजी आमदार सिरीज देशमुख, रविंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस प्रवीणकुमार शेप, जिल्हा सरचिटणीस भास्कर केदार,बाळासाहेब ठोंबरे, नारायण होेके, बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, शिरूर तालुका अध्यक्ष रमेश सानप,  केज तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे, पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष महेश बेदरे, आष्टी तालुकाध्यक्ष रवि ढोबळे, माजलगाव तालुकाध्यक्ष महाविर मस्के, अशोक देशमुख,फरदी देशमुख, अनिल मुंडे, प्रविण देशमुख, बीड शहराध्यक्ष परवेझ कुरेशी, शिरूर शहराध्यक्ष असेफ शेख,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव, मागास्वर्गीय सेल जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, निराधार निरक्षित जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन, गणेश जवकर प्रदेश सरचिटणीस, किसन काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल पाठक, रोजगार स्वंरोजगार जिल्हाध्यक्ष विष्णु मस्के, गणेश करांडे, युवक काँग्रेस बीड विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, युवक काँग्रेस शिरूर तालुकाध्यक्ष अशोक केदार, माजलगाव विधानसभा अध्यक्ष विजय पवार, बीड तालुका सचिव शेख अर्शाद, शेख, ओबीसी बीड शहराध्यक्ष सय्यद फरहान, राम शेळके, शेख सिराज पटेल, बाळासाहेब जगताप, आल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख बबलू, गणेश गंगणे,  माजलगाव शहराध्यक्ष, आफरोज तांबोळी, अशोक बहिरवाळ,  वचिष्ठ बेड, प्रशांत पवार, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. प्रेरणा सुर्यवंशी, कराड मॅडम, यांच्यासह बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा