बनावट दारू तयार करुन तिची विक्री करणाऱ्या गुंडाची MPDA कायद्याअंतर्गत हर्सल कारागृहात रवानगी.




 

बनावट दारू तयार करुन तिची विक्री करणाऱ्या गुंडाची MPDA कायद्याअंतर्गत हर्सल कारागृहात रवानगी

बीड

जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफीयाचे तसेच हातभट्टीची दारु तयार करुण विक्री करणाऱ्याचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बन्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरून पोलीस निरीक्षक श्री. सलीम चाऊस पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी यांनी दिनांक 29/07/2023 रोजी इसम नामे पिंटु ऊर्फ सिध्दार्थ भगवान देवडे वय 38 वर्षे रा. अशोक नगर, परळी वै. ता. परळी वै. जि.बीड याचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.

सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे संभाजीनगर, येथे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अंबाजोगाई, पाथरी व सोनपेठ यांचे अभिलेखावर नशा कारक किंवा अपायकारक औषधी द्रव्य (बनावट दारू) तयार करणे, तिची चोरटी विक्री करणे, ताब्यात बाळगणे, घराविषयी आगळीक करणे, दंगा करणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे वगैरे स्वरुपाच्या 106 गुन्हयांची नोंद होती. त्यापैकी 04 गुन्हे न्यायप्रविष्ट असुन 02 गुन्हे तपासावर आहेत. सदरील इसम हा बनावट दारू तयार करुन चोरटा व्यापार करीत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. सदर इसमावर यापुर्वी CrPC कलम 110 प्रमाणे तसेच कलम 56 (1) अ मपोका व कलम 93 महाराष्ट्र मदय निषेध अधिनियम प्रमणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा जोमाने बनावट दारु तयार करुन, ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याचे गुन्हे तसेच दहशत पसरविण्याचे गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता,

सदर प्रकरणात मा. श्रीमती दिपा मुदोळ मुंडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांचे आदेश क्रमांक जा.क्र. 2023/ आरबी डेस्क- 1 /पोल- 1 /एम. पी. डी.ए.-09 दि. 10.08.2023 अन्वये सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानवध करणे बाबत त्यांचे कडील आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो.नि.श्री. सलिम चाऊस पो.स्टे. संभाजीनगर, परळी वै. व पो.नि. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. स्थागुशा बीड यांचे टिम ने गोपनिय खबऱ्याचे आधारे सदर स्थानबद्ध इसमास दि. 21.08.2023 रोजी 10.50 वा. ताब्यात घेऊन पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वै. येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हसूल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 21.08.2023 रोजी हजर करुन स्थानबध्द केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्रीमती कविता नेरकर पवार, उपविपोअ अंबाजोगाई श्री. अनिल चोरमले, पो.नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि सलीम चाऊस, पोअं मस्के, सानप, पोउनि पंतगे पो.स्टे. पाटोदा व बीड स्थागुशा चे पोह अभिमन्यु औताडे, पोउपनि तुपे, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, भागवत शेलार, गणेश मराडे व विकी सुरवसे यांनी केलेली आहे. भविष्यातही बनावट दारु तयार करणारे, हातभट्टीची दारु तयार करणारे, विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहादर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा