माजलगाव शहरासह ग्रामीण भागात नागपंचमी उत्साहात साजरी




माजलगाव शहरासह ग्रामीण भागात नागपंचमी उत्साहात साजर
ज्योतीराम पाढंरपोटे/माजलगाव
समृद्ध अधिवासाचे प्रतीक, शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माजलगाव शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी दि २१ ऑगस्ट सोमवार रोजी नागपंचमी उत्साहात साजरी केली.वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नागांचे पूजन करण्यास बंदी असल्याने महिलांनी नागाच्या प्रतिमेच्या पूजनावर भर दिला.
नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण समजला जातो,या दिवशी श्री शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे.या वेळी दि २१ ऑगस्ट सोमवार रोजी नागपंचमी आल्याने महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी टेकडीवर जाऊन वारुळाचे पूजन केले.काही वर्षापूर्वीपर्यंत नागपंचमीच्या दिवशी गारूडी सकाळी नागाला पेटाऱ्यात घेऊन गल्लोगल्ली फिरायचे.नागरिक व महिला याच नागाला दुधाचा नैवेद्य दाखवायचे.मात्र, वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार नाग बाळगण्यास तसेच जिवंत नाग पूजनावर बंदी आली आहे.त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत नागाच्या आखीव रेखीव मूर्तीही उपलब्ध झाल्या आहेत.यंदाही महिलांना या प्रतिमांचे पूजन केले.
सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला.
           
      नागपंचमीचे महत्व
हिंदू धर्मात नाग पंचमीला विशेष महत्त्व आहे.नागपंचमीच्या दिवशी सुख-समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते.ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवाची पूजा करावी.यामुळे सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.
           
नागपंचमीच्या दिवशी हे काम टाळावे
• नागपंचमीच्या दिवशीही उपवास केला जातो असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते.
• नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करावीत.
• ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु केतू भारी आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी.
• लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये, यासाठी तांब्याचे भांडे वापरावे
नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा नागपंचमीचा सण पहिल्या श्रावण सोमवार म्हणजे दि २१ ऑगस्ट रोजी साजरा झाला आहे.या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख- शांती राहते,असा समज आहे.अनेकजण या दिवशी उपवासही करतात.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा