हवालदिल शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी – मेटे




 

शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट ; पीक विमा मंजूर करा…रामहरी मेटे

बीड

बीड जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत आलेलं पीक आज कोमजून जात आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. आज शेतकऱ्यांना मदतीची व मानसिक आधाराची गरज आहे . महाराष्ट्राचे कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील आहेत . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उद्या बीडमध्ये जाहीर सभा घेत आहेत तेव्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने मदत जाहीर करतील अशी अपेक्षा शिवसंग्राम नेते रामहरी मेटे यांनी व्यक्त केली आहे .

बातमी सविस्तर : यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतातील पिके करपून जात आहेत. जवळपास एक महिनाभर झालं जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. हाताशी आलेलं पीक डोळ्यादेखत करपून जात आहे . शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांना पिक विम्या सहित शासनाने मदत जाहीर करण्याची खूप गरज आहे अन्यथा अहवाल दिल झालेला शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन पुन्हा आत्महत्येच्या दिशेने टोकाचे पाऊल उचलू नये ही शासनाने खबरदारी घ्यावी असे मत शिवसंग्राम नेते रामहरी मेटे यांनी व्यक्त केले.

आज खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांनी बी-भरण केले. शेतात खते टाकली. शेतीची मशागत केली आणि पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बसला परंतु निसर्गाने साथ दिली नाही . एक महिनाभर झालं पाऊस नसल्याने आज हाताशी आलेलं कापूस , सोयाबीन , ऊस अशी विविध पिके आज कोमोजून जात आहेत . त्यामुळे खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज आहे त्याच बरोबर त्यांना पिक विमा व तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही आज शासनाने देणे गरजेचे आहे . उद्या 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची भव्य सभा होत आहे या सभेमध्ये उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील व त्यांना मदतीची जाहीर घोषणा करतील अशी अपेक्षा आहे . आज महाराष्ट्रातील राजकारण सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडे गेले आहे परंतु अशा कठीण प्रसंगात सुद्धा वर्तमान सरकार हे चांगल्या पद्धतीने काम करत असून ते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्याची राज्य सरकारला मोठी संधी आहे त्यामुळे बीडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेमध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल आणि शेतकऱ्यांना मदतीचा आधार मिळेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा