सिंदफणा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्याना सायकलचे वाटप




सिंदफणा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना २०० सायकलचे वाट !
वडवणी
गेल्या अनेक वर्षापासून मानव विकास अंतर्गत प्रशासनाच्या माध्यमातून गरजूवंतांना सायकलचे वाटप केले जात आहे त्याच पद्धतीने आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी वडवणी येथील सिंदफणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या मानव विकास अंतर्गत गोरगरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना दोनशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना सायकलचे वाटप करतांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीभाऊ रांजण, देवदूत ओम प्रकाशजी शेटे, वडवणी नगरीचे नगराध्यक्षपती शेषेराव जगताप, उपनगराध्यक्ष बन्सीधर मुंडे, नगरसेवक संभाजी शिंदे, माजी सरपंच गंपू पवार, माजी नगरसेवक महादेव जमाले, व सिंदफणा माध्यमिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे की शासनाच्या माध्यमातून मानव विकास अंतर्गत प्रत्येक शाळेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनींना पाच किलोमीटर अंतर्गत येणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते जेणेकरून त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी अडचण होणार नाही. शाळेची गरजही भागेल आणि सायकल मुळे  व्यायामही होईल असे दोन महत्त्वपूर्ण फायदे विद्यार्थ्यांना होणार आहेत.  म्हणून आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सिंदफणा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांनी 200 विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केले आहे. यावेळी सर्व विद्यार्थी सायकल स्वीकारतांना अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वसंडून वाहत होता. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे मुलं ही देशाची फुल आहेत आणि देशाचं भविष्य सुद्धा घडवणारीही मुलं आहेत. म्हणून तर जगामध्ये भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे सिंदफणा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी शिक्षक वृंदा व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा