पडरे पावसा पडरे पावसा, कर पाणी पाणी! शेत माझं लयी ताहणला चातकावाणी!!




पडरे पावसा पडरे पावसा, कर पाणी पाणी! शेत माझं लयी ताहणला चातकावाणी!

बीड जिल्ह्यासह राज्यभरात दुष्काळाचे सावट?
===========
(शेख आतिख )- तलवाडा

बीड जिल्ह्यासह
राज्यभरात पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असुन बीड जिल्ह्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस आतापर्यंत झाल्या चे सर्वत्र चित्र असुन पडरे पावसा पडरे पावसा, कर पाणी पाणी! शेत माझं लयी ताहणला चातका वाणी!! या रचनेतुन शेतकरी आशावादी नजरेने आभाळाकडे पहात टाहो फोडत आहे.

जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने भयावह परिस्थिति पहण्यास मिळत आसतांना पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार आता या महिन्यात पाऊस नसणार आहे तर सरळ सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना हवामान विभागाच्या वतीने देण्यात आसल्याने बळीराजाच्या दिवेधेत वाढ झाल्याची परिस्थिति असुन
हवामान विभागाच्या म्हणन्यानुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आसतांना . आता ऑगस्ट महिन्याचे फक्त काही दिवस राहिले आहे. या राहिलेल्या दिवसातही राज्यात पाऊस नाही. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवेली आहे.

पाऊस रखडन्याचे मुख्ये कारण आसे सांगीतले जात आहे की प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे सध्या राज्यात पाऊस नाही. यापूर्वी भारतात २००४, २००९, २०१४ आणि २०१८ मध्ये अल निनोचा प्रभाव होता. त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता. यंदा अल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. बीड जिल्ह्यासह राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजून पाऊस काही दिवसांनी होणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणार आसल्याचा अंदाज वर्तवला जात आसल्याने पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे हवामान विभागाच्या वतीने करण्यात येत आसले तरी सर्व काही कर्मावर आवलुंबुन असल्याचे मत जानकार व्येक्त करत असुन या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतक-याने या विषयी बोलत आसतांना या ओळीतुन प्रतिक्रिया दिली,जैसा कर्म करेंगा वैसा फल देगा भगवान,,

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा