शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यास नेकनूर पोलिसांनी केले जेरबंद




शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यास नेकनूर पोलिसांनी केले जेरबंद

बीड | बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथून पाच शेळ्या चोरणाऱ्या चोरट्याला वाहनासह नेकनूर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून चोरी केलेल्या शेळ्या जप्त केल्या आहेत. नाना बिरु काळे (रा. मस्सा योगेश्वरी ता. कळंब जि. धाराशिव) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याने उदंड वडगाव येथील अमर चव्हाण व दिलीप चव्हाण यांच्या ५ शेळ्या चोरी केल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे, उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, कर्मचारी दत्तात्रय बळवंत, प्रशांत क्षीरसागर, अनिल राऊत, बाळासाहेब ढाकणे यांनी ही कारवाई केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा