बोरखेड महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती




“बोरखेड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना बायस्टेट ऍग्रो मुंबई लिमिटेड कंपनीतर्फे शिष्यवृत्ती .”

बीड

दि. 26 ऑगस्ट 2023 शनिवार रोजी “आदर्श शिक्षण संस्था बीड संचलित बोरखेड माध्यमिक व उच्च माध्यमिक” विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना बायोस्टेट ऍग्रो मुंबई लिमिटेड कंपनीतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री जोगदंड सर व प्रमुख पाहुणे श्री जगदीश शेठ मंत्री, श्री योगेश शेठ मंत्री, कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर सलीम अली साहेब, मेश्राम साहेब एरिया मॅनेजर ,बोरखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री सुनील अनपट यांच्या शुभहस्ते विद्येची देवता माता सरस्वती व बीड जिल्ह्याच्या भाग्यविधात्या, शिल्पकार स्वर्गीय सौ.केशर काकू क्षीरसागर यांच्या पावन प्रतिमेचे पूजन हस्ते संपन्न झाले . उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संपन्न झाले. व उत्कृष्ट असे बोरगे गणेश याने स्वागत गीत सादर केले.
कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर सन्माननीय अली साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
बायस्टेट ऍग्रो कंपनीच्या वतीने विद्यालयातील गरीब होत करू दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2500 रुपये शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगदीश शेठ मंत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चारित्र्यसंपन्न रहा. नीतिमत्ताने अभ्यास करा असा मंत्र दिला.
अध्यक्षीय भाषणात
विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री जोगदंड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नेहमी कृतिशील राहिले पाहिजे, जिद्द आणि चिकाटीनेअभ्यास करून आपले स्वप्न साकार केले पाहिजे. तसेच बायोस्टेट ऍग्रो मुंबई लिमिटेड कंपनीचे व श्री जगदीश शेठ मंत्री यांचे आभार मानले. प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण मामा सुतार, श्री निळकंठ भाऊ काकडे, श्री अरुण काका काकडे, भाऊसाहेब काका शिंदे, आत्माराम बापू शिंदे, श्री संजय सोनटक्के, श्रीराम बोराटे, ज्येष्ठ शिक्षक श्री घरत सर, श्री लहाने सर, श्री करांडे सर, श्री आरसूळ सर, श्रीमती कांबळे मॅडम, श्री जगताप सर, श्री येडे तात्या, श्री बाळासाहेब आवचर, श्री बडे, सर्व पालक, शेतकरी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आवचर सर यांनी केले. आभार श्री जाधव सर यांनी मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा