गर्भपात प्रकरणी अटकपुर्व जामीन मंजूर- अॅड. तेजेस नेहरकर




गर्भपात प्रकरणी अटकपुर्व जामीन मंजूर- अॅड. तेजेस नेहरक

 

बीड   घटनेची हकीकत अशी की, पिडीतेच्या फिर्यादीवरुन ती हिवरपहाडी, ता.जि.बीड़ येथे तिच्या राहत्या घरी असताना शेजारच्या लोकांनी भाडंणाची कुरापत काढुन आरोपी नामे, उद्धव शिंदे, काशिबाई शिंदे, सुमन शिंदे व निलावती शिंदे या सर्वानी मिळुन तीच्या पतीस मारहाण केली. व आरोपीस पिडीत महीला गर्भवती आहे अशी माहिती असतांना जाणीवपुर्वक खाली पाडुन तिच्या पोटात लाथाबुक्याने मारहाण केल्यामुळे तिचा गर्भपात झाला. अशा फिर्यादीवरुन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 25/05/2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यात कलम 143, 312, 313, 323, 504 व 506 भा.द.वी सह तसेच फिर्यादी सरकारी दवाखान्यामध्ये अँडमिट असल्यामुळे डॉक्टाराच्या प्रमाणपत्रावरुन गुन्हात कलम वाढ झाली होती. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अटकपूर्व जामीन अॅड. तेजस नेहरकर यांच्या मार्फत मा. जिल्हा न्यायाधिश बीड यांच्याकडे दाखल करण्यात आलेला होता.

या प्रकरणात अॅड. तेजस नेहरकर यांनी आरोपीच्या वतीने मांडलेली बचावाची भारी भक्कम बाजु, व उत्कृष्ट युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मा. न्यायालय बीड यांनी मंजूर केलेला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. तेजस नेहरकर यांनी काम पाहिले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा