मराठा समाजाला” कुणबी मराठा”प्रमाणपत्र मिळावे; मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा , लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ टाळ मृदंगाच्या गजरात लिंबागणेशकरांचे चक्का जाम आंदोलन 




मराठा समाजाला” कुणबी मराठा”प्रमाणपत्र मिळावे; मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा , लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ टाळ मृदंगाच्या गजरात लिंबागणेशकरांचे चक्का जाम आंदोलन
 लिंबागणेश
महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून मराठा समाजाला ‘कुणबी मराठा ‘प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. अंतरवली (सराटी) ता.अंबड जि.जालना येथील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा व उपोषण दरम्यान १ सप्टेंबर रोजी पोलिस प्रशासनाकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी यासह या घटने संदर्भात मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा यांनी आज दि.०७ सप्टेंबर गुरुवार रोजी जिल्हाभरात “गावनिहाय चक्का जाम”आंदोलनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली  बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गांवरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बसस्थानक येथे टाळ मृदंगाच्या गजरात व भक्ती गीतांच्या जयघोषात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. निवेदन नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार, मंडळ अधिकारी वंजारे, तलाठी पोतदार, लिंबागणेश पोलिस चौकी हे.का. संतोष राऊत, नवनाथ मुंडे,उद्धव तांबे यांना निवेदन देण्यात आले.
    यावेळी आंदोलनात राजेभाऊ गिरे, कल्याण बापु वाणी, सुंदरनाना जाधव, सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, रविंद्र निर्मळ, पांडुरंग वाणी, बाबुराव वाणी, दामु आण्णा थोरात बाळासाहेब मुळे, विक्रांत वाणी, अभिजित गायकवाड, महावीर जाधव, सुधीर वाणी, औदुंबर नाईकवाडे, संतोष भोसले, विनायक मोरे, संजय घोलप, संभाजी वाणी, अंकुश गायकवाड,दादा गायकवाड, सखाराम घोलप, प्रकाश ढवळे,आरूण ढवळे,चिंतामण ढास,सुरज ढास, संजय सुकाळे आदि.ग्रामस्थ हजर होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा