मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या: वंशावळीचे दस्तावेज नसल्याने आम्हाला फायदा होणार नाही; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या: वंशावळीचे दस्तावेज नसल्याने आम्हाला फायदा होणार नाही; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

जालना

सरकारच्या अध्यादेशाची प्रत आपल्याकडे आली नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची गरज आहे, आमच्याकडे वंशावळीचे दस्तावेज नाहीत, वंशावळीचे दस्तावेज नसल्याने आम्हाला फायदा होणार नाही, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणत वंशावळ शब्दांत सुधारणा करत सरसकट अशी सुधारणा करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वंशावळ नसणाऱ्यांनी सरसकट आरक्षण द्यायला हवे, आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय मान्य केला आहे. आम्ही 10 पाऊडले मागे येण्यास तयार आहोत. निर्णय स्वीकारला असला तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहोत, आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. आज किंवा उद्या जीआरमध्ये बदल करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

अधिकारी शब्दांचा खेळ करतील

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची मुळ मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. अधिकाऱ्यांकडून शब्दांचे खेळ होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. 2 दिवसांत सरकारने जीआरमधील शब्दांत सुधारणा करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

उपोषणाचा दहावा दिवस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. त्यामुळे उपोषणाचा परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होताना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी आरोग्य विभागचे एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांची बीपी कमी झाली असून, त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.

रक्तात बिलीरुबिन वाढतंय

यावेळी बोलतांना डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे यांचे रक्त चाचणी झाली आहे. तर ते पाणी पित नसल्याने युरिन आऊटपूट कमी होत आहे. रक्तात बिली रुबिन प्रमाण वाढत आहे. त्याचे परिणाम किडनीवर होत आहे. त्यामुळे अँटीबायोटिक सुरू केले आहे. सध्या एक सलाईन लावण्यात आले असून, त्यांची प्रकृती पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा