समर्थ विध्यामंदिर तलवाडा येथे बाल गोपाळांनी साजरा केला दहीहंडीचा सण




समर्थ विध्यामंदिर तलवाडा येथे बाल गोपाळांनी साजरा केला दहीहंडीचा सण

शेख आतिख/तलवाडा

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील समर्थ विध्यामंदिर म्हणजे शिक्षणाबरोबरच बाल गोपाळांसाठी पारंपारिक सणांची मेजवानी ठरत आहे. नुकताच पार पडलेल्या रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधत या शाळेचे विश्वस्त श्री गोपाल शर्मा सर, व शर्मा मॅडम यांनी समर्थ विध्यामंदिर शाळेतील विध्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्याने विध्यार्थ्यांकडुन शाळेतील झाडांना राख्या बांधुन वृष संवर्धनाचा संदेशपर कार्यक्रम घेण्यात आला होता. शाळेच्या स्थापने पासुनच येथे विविध धार्मिक सणवार पारंपरिक पद्धतिने साजरे केले जाऊन भारतिय संस्कृति सातत्याने ठिकवण्याचा या शाळेचा मानबिंदु आसल्याचे दिसुन येते. दिं ९/९/०२३ शनिवार रोजी गोकुळ आष्टमिच्या आणुषंगाने या शाळेतील बालगोपाळांनी उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला. शाळेतील मुला-मुलींनी विविध कृष्णगीतांवर फेर धरून नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली.
लहान वयापासून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत, या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. म्हणूनच दर वर्षी दहीहंडीचा सण शाळेत उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शाळेतील सर्व विद्यार्थी, विध्यार्थ्यीनी त्यांचे पालक व शिक्षकांनी कृष्णगीतांवर फेर धरून नृत्य केले. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून शाळेत दहीहंडीची तयारी सुरू झाली होती. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर बालदोस्तांनी नृत्य सुरू केले होते. प्रत्येक वर्गाचा नृत्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बच्चेकंपनी राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये नटूनथटून आली होती. मुलींच्या टिपरीनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली होती. बाल गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन-तीन थरांवर हंडी फोडली. शाळेचे विश्वस्त व सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला. पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग
समर्थ विद्यामंदिर येथे सातत्याने दिसुन येतो. कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. दहीहंडीच्या कार्यक्रमातही नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्व पालकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला जातो. दहीहंडी सजावट, बांधणी, प्रसाद बनविणे या सर्व कामांत पालकांनी व गुरुजनांनी सक्रिय भाग घेतला. पालक प्रतिनिधी, शाळेचे वाहन चालक व ईतर कर्मचारी वर्गाने देखील बालगोपाळांच्या या दहीहंडीसाठी सहकार्य व मदत केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा